Sunday, May 19, 2024
HomeजळगावPhotos # महापालिकेच्या मानाच्या गणेशाच्या महाआरतीने जळगावात विसर्जन मिरवणूकीस सुरवात

Photos # महापालिकेच्या मानाच्या गणेशाच्या महाआरतीने जळगावात विसर्जन मिरवणूकीस सुरवात

डॉ. पंकज पाटील

जळगाव jalgaon | प्रतिनिधी

- Advertisement -

गेल्या दहा दिवसापासून (ten days) घराघरात आणि गल्लीबोळातील (home and in the streets) मंडपात विराजमान (seated in the pavilion) झालेल्या श्री गणरायाला (Shri Ganaraya) आज अनंत चतुर्थीस (Anant Chaturthi) मोठ्या भक्तीमय वातावरणात निरोप (Farewell in a devotional atmosphere) देण्यात येत आहे. जळगाव शहरात सकाळी अकरा वाजता मानाच्या महापालिकेच्या (Respected Municipal Corporation) गणपतीची महाआरती (Mahaarti of Ganpati) करत गणेश विसर्जन मिरवणूकीस (Ganesh immersion procession) ढोल ताश्याच्या गजरात (Dhol Tashya’s) सुरवात झाली आहे.

सकाळी अकरा वाजता महापालिकेच्या मानाच्या पहिल्या गणपतीची महा आरती महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली. महाआरतीनंतर विसर्जन मिरवणूकीस सुरवात झाली.

अन् आयुक्तासह महापौरांनी धरला ठेका

गणेश विसर्जन मिरवणूकीतील ढोल ताश्याचा दणदणाट कानी पडताच ऐकणार्‍याचे पाय आपोआपच थिरकायला लागलात. त्यानुसार महापालिकेच्या मानाच्या गणपतीची आरती झाल्यानंतर विसर्जन मिरवणूकीसाठी ढोलताशे वाजू लागले आणि महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह महिला नगरसेविका, नगरसेवक यांनी महापालिकेच्या गणेशासमोर ठेका धरला. जवळजवळ तासभर या सर्वांनी ढोलताशांवर ठेका धरून आनंद लुटला.

सकाळी आठपासूनच विसर्जन

सकाळी ८ वाजेपासून भाविकांना विसर्जन करता यावे, यासाठी महापालिकेचे अग्निशमन विभागाचे २५ जणांचे पथक दिवसभर मेहरुण तलाव परिसरात तैनात करण्यात आले आहे. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळी १० वाजेपासून सुरुवात झाली. विसर्जन मिरवणुकीची सुरुवात सकाळी महापालिकेतील मानाच्या गणपतीची आरतीने झाली. मेहरुन तलावावर मनपा बांधकाम विभागाकडून बॅरिकेट्स लावण्यात आलेले आहेत.

७० ते ८० सार्वजनिक गणेश मंडळ

विसर्जन मिरवणुकीसाठी यंदा ७० ते ८० सार्वजनिक गणेश मंडळानी सहभाग घेतला आहे. मंडळाचे कार्यकर्ते व व्यवस्था पाहणार्‍या कार्यकर्त्यांनी सकाळी विविध वेशभूषा करून मिरवणूकीत शिस्तबधदपणे सहभागी झालेले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या