Tuesday, July 16, 2024
Homeनगरपोलीस निरीक्षक करे यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी कुकाण्यात रास्तारोको

पोलीस निरीक्षक करे यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी कुकाण्यात रास्तारोको

कुकाणा |वार्ताहर| Kukana

- Advertisement -

वाळुतस्करांशी पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या झालेल्या संभाषण क्लिप प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करावी तसेच वादग्रस्त ठरलेल्या याच निरीक्षकास पुन्हा नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या नेमणूक प्रकरणीही चोेैकशी करावी आदी मागण्यांसाठी कुकाणा येथील व्यापारी संघटना व जाणता राजा ग्रुपच्यावतीने एक तास रास्तारोको आंदोलन करून पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना निवेदन देण्यात आले.

आवाहनानुसार बंदमध्ये सहभाग घेतलेली दुकाने निवेदन दिल्यानंतर पूर्ववत सुरू झाली. यावेळी मनसेचे विलासराव देशमुख, माजी सरपंच एकनाथ कावरे, बाबासाहेब गोल्हार, बाळासाहेब गर्जे, भैरवनाथ भारस्कर, रसुल इनामदार, सुभाष चौधरी, राहुल जावळे, राजेंद्र बागडे, चंपालाल बोरा, जवाहर भंडारी, अरबाज शेख, संदीप कोलते यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.

निवेदनात नेवासा तालुक्यात सामाजिक तेढ व जातीय सलोखा बिघडवण्यास निरीक्षक करे यांची मनमानी कार्यपद्धती कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला. कुकाणा गावात शामसुंदर खेसे यांच्या घरावर पडलेल्या दरोड्याचा तपास करे यांना लावता आला नाही. धमकावून फिर्यादी नोंदवून घेणे व आरोपींकडून तडजोड करणे अशीच त्यांची कार्यपद्धती आहे असा आरोप यावेळी करण्यात आला.

कुकाण्यात बिंगो जुगारातून लाखो रुपयांची मलई दरमहा घेतली जात आहे. तालुक्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न निरीक्षकच स्वार्थ साधण्यासाठी अप्रत्यक्षपणे करत असल्याचा आरोप करण्यात आला असून पोलीस निरीक्षक करे यांच्या ऑडियो क्लिपमुळेे ते वाळुतस्करांशी आर्थिक संधान साधून होते हे स्पष्ट झालेले असल्याचा दावा करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

करेंच्या समर्थनार्थ उद्या रास्तारोको

नेवासाफाटा |वार्ताहर| Newasa Phata

सर्वधर्मीय समाजाच्या वतीने काँग्रेसच्या एससी विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण साळवे आणि आरजे ग्रुपचे सोनू जहागीरदार यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन विजय करे यांच्या समर्थनार्थ त्यांची बदनामी करणार्‍यांची चौकशी करावी या मागणीचे निवेदन देऊन उद्या 3 सप्टेंबर रोजी नेवासाफाटा येथे डॉ. आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला.

काही समाजकंटकांनी त्यांचे अवैध धंदे बंद झाल्याने करे यांच्या विरोधात कटकारस्थान रचून पोलीस यंत्रणेवर दबाव आणण्याचे काम केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवेदनावर प्रवीण साळवे, सोनू जहागीरदार, विवेक घुले, किरण बोडखे, शरीफ शेख, फारुख शेख, दत्ता मोरे, शादाब तांबोळी, इरफान शेख, आकाश हिवाळे, अनिकेत साठे, अशोक घोडके, महेश धायतडक यांची नावे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या