Thursday, September 19, 2024
HomeनाशिकVideo : पिंपळद-ब्राह्मणवाडे पुलावर पाणी; ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालून प्रवास

Video : पिंपळद-ब्राह्मणवाडे पुलावर पाणी; ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालून प्रवास

पुलाची उंची वाढविण्याची ग्रामस्थांची मागणी

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात काल रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात (Nashik Dam Position) वाढ होतांना पाहायला मिळत आहे. तर बऱ्याच ठिकाणी नद्यांना पूर आल्याने काही ठिकाणी ग्रामस्थ जीव धोक्यात घालून प्रवास करतांना दिसत आहेत. अशातच आता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद येथील किकवी नदीवरील एक व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये दोघेजण पुलावरून पाणी गेलेले असताना दुचाकीने प्रवास करतांना दिसत आहे.

हे देखील वाचा : Nashik Rain News : जिल्ह्यात पावसाची संततधार; गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्र्यंबकेश्वर तालुक्यात (Trimbakeshwar Taluka) पावसाची (Rain) संततधार सुरु असल्याने तालुक्यातील पिंपळद (Pimplad) येथील किकवी नदीला (Kikvi River) पूर आला आहे. त्यामुळे पिंपळद ते ब्राह्मणवाडे (Pimplad to Brahmanwade) या गावाला जोडणाऱ्या पुलावरून पाणी गेले आहे. यामुळे ब्राह्मणवाडेकडून पिंपळद आणि त्र्यंबकेश्वर येथे ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.

दरम्यान, त्र्यंबकेश्वरपासून ब्राह्मणवाडे हे गाव नऊ किलोमीटर अंतरावर असून पावसाळ्यात अनेकदा पिंपळद येथील किकवी नदीच्या पुलावरून पाणी जात असते. त्यामुळे भर पावसाळ्यात (Rain) ग्रामस्थांना व दुचाकी धारकांना पुराच्या पाण्यातून वाट काढून जावे लागते. यामुळे सरकारने तातडीने लक्ष घालून पिंपळद येथील पुलाची (Bridge) उंची वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या