Friday, May 17, 2024
Homeधुळेअपर तहसीलदारांसह दोघांवर विनयभंगाचा गुन्हा

अपर तहसीलदारांसह दोघांवर विनयभंगाचा गुन्हा

पिंपळनेर – Pimpalner – वार्ताहर :

विनयभंगासह आपल्याकडून पैसे मागितल्याची तक्रार करत येथील सेतू केंद्रातील महिला ऑपरेटरने दिलेल्या फिर्यादीनुसार येथील अपर तहसीलदार विनायक थवील व संदीप मुसळे यांच्याविरुद्ध पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

संबंधित सेतू चालक महिलेला नोटिस काढल्याचा व सेतू कार्यालय शिप्ट केल्याचा राग आला. तसेच आपण पिंपळनेरसह पश्चिम पट्टयात आदिवासी बहुल भागात चांगले काम करत असल्याने हे कोणाला तरी खटकत आहे. स्वस्त धान्य पुरवठ्याबाबत यापूर्वी दोन गुन्हे दाखल केले आहेत. जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. चांगले काम करू नये, यासाठीच शासकीय अधिकार्‍यांविरोधात असे षडयंत्र केले जाते. चौकशीत सत्य कळेलच.

- Advertisement -

विनायक थवील,अपर तहसीलदार, पिंपळनेर

याबाबत संबंधित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पिंपळनेर येथील अपर तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात ऑपरेटर असून याचा गैरफायदा घेत अपर तहसीलदार विनायक थवील यांनी आपण चालवीत असलेल्या सेतू केंद्राबाबत नियमबाह्य नोटिसा दिल्या.

तसेच लज्जास्पद बोलून शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरवात केली. त्यावरून अपर तहसीलदार विनायक थविल व संदीप मुसळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या