Sunday, May 19, 2024
Homeधुळेपिंपळनेर-सटाणा रस्ता कामाची गुणवत्ता तपासणार

पिंपळनेर-सटाणा रस्ता कामाची गुणवत्ता तपासणार

पिंपळनेर Pimpalner। वार्ताहर

पिंपळनेर-ताहाराबाद-सटाणा (Pimpalner-Taharabad-Satana) या रस्त्याच्या (road) कामाच्या दर्जाची गुणवत्ता (quality of work) नियंत्रण कार्यालयाकडून तपासणी(check) करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांनी दिले आहेत, अशी माहिती आ.सौ.मंजुळा गावित (Mla Manjula Gavit) यांनी दिली.

- Advertisement -

साक्री तालुका विधानसभा मतदार संघात राष्ट्रीय महामार्ग क्र. रामा-752 जी पिंपळेनर-ताहाराबाद-सटाणा या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. हा रस्ता एम.एस.आर.डी.सी या विभागाकडे असून सदर काम गुजरात राज्यातील आशिष इन्फ्राकॉन अनंता प्रोकान (जेव्ही) प्रायव्हेट लिमीटेड अहमदाबाद येथील कंपनीमार्फत सुरू आहे. सदर कंपनीने स्कॉयलॉन कंपनी या उपठेकेदारास काम दिलेले आहे. या कंपनीमार्फत सुरू असलेले काम अतिशय संथ गतीने सुरू असून रस्त्याचे रुंदीकरण दर्जा सुधारणा करणे, योग्य त्या ठिकाणी संरक्षण कठडे उभारणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूस मुरूमाचा भराव करणे, अशी कामे करणे आवश्यक आहे. परंतु, सदर कंपनीने अतिशय निकृष्ठ दर्जाचे काम केले आहे.

पिंपळनेर-ताहाराबाद हा रस्ता दोन्ही बाजूस सर्वत्र खोदून ठेवलेला आहे. मुरूमाच्या भरावाच्या जागी माती मिश्रीत मुरूमाचा भराव केला आहे. त्यामुळे पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. वाहन चालकांना या रस्त्यांवरून अतिशय संथ गतीने वाहने चालवावी लागतात. दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. अत्यंत रहदारीच्या रस्त्यावर वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत असल्यामुळे रूग्णवाहिका रूग्णास घेवून वेळेवर दवाखान्यात जावू शकत नाही. अपघातात जखमी झालेल्या रूग्णांना वेळेवर उपचार घेण्यासाठी दवाखान्यात जाता येत नाही.

काँक्रीटीकरणाचे केलेले काम अतिशय सुमार दर्जाचे आहे. त्याला प्रचंड तडे पडले आहेत. साक्री विधानसभा मतदार संघातील काही मजुरांनी या रस्त्यावर रोजंदारीने काम केले आहे. गेल्या 7 ते 8 महिन्यांचा पगार अद्याप त्यांना देण्यात आलेला नाही. अशा असंख्य तक्रारी या रस्त्याच्या कामाबद्दल असल्याची तक्रार आ. गावीत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने ना. शिंदे यांनी नुकताच कामाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव, आ. सौ.मंजुळा गावित, शिवसेनेचे धुळे जिल्हाप्रमुख डॉ.तुळशिराम गावित तसेच एम.एस.आर.डी.सी या विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यात मंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपळेनर-ताहाराबाद-सटाणा रामा-752 जी या रस्त्याच्या झालेल्या कामाच्या दर्जाची गुणवत्ता नियंत्रण कार्यालयाकडून तपासणी करण्याचे आदेश दिले. या पूर्ण रस्त्याचे काम येत्या डिसेंबर अखेर चांगल्या पद्धतीने पुर्ण करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या असल्याची माहिती आ. सौ.मंजुळा गावित यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या