Sunday, May 19, 2024
Homeनगरपिंपरी निर्मळ सेवा सोसायटीची निवडणूक दुरंगी

पिंपरी निर्मळ सेवा सोसायटीची निवडणूक दुरंगी

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राहाता तालुक्यातील गणेश परीसरातील राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या पिंपरी निर्मळ सेवा सोसायटीच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या दिवशी 15 अर्ज माघारी झाले. तिन पॅनल मिळून 36 अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.

- Advertisement -

शंभर वर्षाची परंपरा असलेल्या पिंपरी निर्मळ सेवा संस्थेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे. 13 जागांच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी 3 गट मिळुन 36 अर्ज शिल्लक राहिले आहेत. त्यामध्ये आ. राधाकृष्ण विखे पाटील प्रणीत सत्ताधारी जनसेवा ग्रामविकास मंडळाचे 13 अर्ज, आ. विखे प्रणीत जनसेवा मंडळाचे 13 अर्ज असून ना. बाळासाहेब थोरात प्रणीत शेतकरी मंडळाचे 9 उमेदवारी अर्ज व एक अपक्ष अर्ज राहिल्याने संस्थेची निवडणूक जवळपास तिरंगी होणार आहे.

यामध्ये सर्वसाधारण कर्जदार मतदार संघातून सत्ताधारी जनसेवा ग्रामविकास मंडळाकडून भाऊसाहेब घोरपडे, बाळासाहेब घोरपडे, शिवाजी निर्मळ, नितीन निर्मळ, संतराम निर्मळ, अनिल निर्मळ, दगडु निर्मळ, अशोक जपे तर जसेवा मंडळाकडुन संदीप घोरपडे, विठ्ठल घोरपडे, भगवान घोरपडे, अंकुश निर्मळ, शंकर निर्मळ, सुनिल पावसे, सिताराम पवार, दत्तात्रय निर्मळ. शेतकरी मंडळाकडुन मच्छिंद्र घोरपडे, लक्ष्मण घोरपडे, सतिष निर्मळ, योगेश निर्मळ, सुधाकर निर्मळ, सुभाष निर्मळ यांचेमध्ये तिरंगी लढत होईल.

महिला प्रवर्गात जनसेवा ग्रामविकास मंडळाकडून उषा घोरपडे, सिंधु निर्मळ तर जनसेवा मंडळाकडून मिना निर्मळ, लक्ष्मीबाई घोरपडे व शेतकरी मंडळाकडून सविता निर्मळ या निवडणूक रिंगणात आहेत.इतर मागास मतदार संघात जनसेवा ग्रामविकास मंडळाकडून डॉ. विकास निर्मळ तर जनसेवा मंडळाचे विश्वनाथ निर्मळ, शेतकरी मंडळाला येथे उमेदवार मिळाला नाही. अनुसुचित जाती जमाती मतदार संघातून जनसेवा ग्रामविकास मंडळाचे देवराम इल्हे, जनसेवा मंडळाचे प्रकाश पारखे, अपक्ष सुनिल पारखे, शेतकरी मंडळाचे विठ्ठल कांबळे यांचेत लढत होईल. भटक्या जाती जमाती मतदार संघात जनसेवा ग्रामविकास मंडळाचे सोमनाथ शेलार, जनसेवा मंडळाचे बाळासाहेब शेलार, शेतकरी मंडळाचे अजय शेलार यांचेत तिरंगी लढत होईल.

साडे बाराशे सभासद मतदानास पात्र असून येत्या 16 तारखेला प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे.तालुका सहनिबंधक श्री. खेडकर यांचे मार्गदर्शनाखाली निवडणूक अधिकारी संजय पाटील, सह निवडणुक अधिकारी बाबासाहेब निर्मळ निवडणुकीचे कामकाज पाहत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या