Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याउन्हाळी कांदा नाफेडतर्फे खरेदीला वाणिज्य मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद : डॉ. भारती पवार

उन्हाळी कांदा नाफेडतर्फे खरेदीला वाणिज्य मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद : डॉ. भारती पवार

नाशिक | प्रतिनिधी Nashik

राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाफेड मार्फत (Nafed) उन्हाळी कांदा (Onion) खरेदी सुरू करण्यासाठी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन कांदा खरेदी सुरू करण्याबाबत निवेदन दिले…

- Advertisement -

या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देउन लवकरच नाफेड मार्फत उन्हाळी कांदा खरेदी सुरू करण्यात येईल, असे आश्वासन गोयल यांनी दिले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी दिली.

कांदा उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. देशभरातील साधारण 30.03 टक्के वाटा असलेल्या कांदा उत्पादनात महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. महाराष्ट्रातील एकूण उत्पादनापैकी सर्वाधिक कांदा उत्पादन नाशिक जिल्ह्यात होते.

चालू हंगामात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. परंतू,अवकाळी पाऊस व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे.

Char Dham Yatra : केदारनाथ, बद्रीनाथ मार्गांवर पुन्हा निसर्ग कोपला… थरकाप उडवण्याऱ्या घटनेचा VIDEO व्हायरल

तसेच नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्‍यांसाठी मागील हंगामातील लाल कांदा नाफेडमार्फत खरेदी केल्याने केंद्रीय मंत्री गोयल यांचे आभार मानले असल्याचेही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टिने सरकार प्रयत्नशील आहे. सद्यस्थितीत कांद्याच्या पडलेल्या किंमती विचारात घेता नाफेडमार्फत कांदा खरेदी प्रक्रिया तत्काळ राबविण्यात यावी याकडे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

Nashik Crime : सख्खा भाऊ पक्का वैरी! दांडका डोक्यात मारत भावाचा खून

ग्राहक व्यवहार विभाग (DOCA), अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार, कांद्याचा बफर स्टॉक तयार करण्यासाठी किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत कांद्याची खरेदी केली जाते. कांद्याची खरेदी FPCs/FPOs मार्फत शेतकरी/शेतकरी गट/शेतकरी उत्पादक संस्थांकडून फार्म गेटवर तसेच सहकारी संस्थांमार्फत लासलगाव आणि पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे प्रचलित बाजार दरांनुसार खुल्या लिलावाद्वारे केली जाते.

राज्यातील किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत २०२२ मध्ये रुपये ३५१ कोटी रक्कमेचा २ लाख ३८ हजार १९६ मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला होता. यात सरासरी रुपये १ हजार ४७५ प्रति क्विंटल भाव कांद्याला मिळाला होता.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Video : त्र्यंबकला अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

यावर्षी देखील कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याने नाफेडमार्फत किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत कांदा खरेदी करण्यात येईल, असेही गोयल यांनी सांगितले असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या