Saturday, April 26, 2025
Homeनगरसिंगल युज प्लास्टिक वापरणार्‍यांवर मनपाकडून कारवाई सुरू

सिंगल युज प्लास्टिक वापरणार्‍यांवर मनपाकडून कारवाई सुरू

प्रोफेसर चौकात पाच आस्थापनांना 25 हजारांचा दंड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सिंगल युज प्लास्टिक संदर्भात महानगरपालिकेकडून पुन्हा एकदा कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे. सावेडी उपनगर परिसरातील प्रोफेसर कॉलनी चौक येथे हॉटेल्स व दुकाने अशा पाच आस्थापनांना महापालिकेकडून 25 हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. शहरात सध्या केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियान राबवले जात आहे. या अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.
आयुक्त यशवंत डांगे यांच्या आदेशानुसार ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत हरितकचरा उचलणे, प्लास्टिक बंदीची शंभर टक्के अंमलबजावणी करून प्लास्टिकचा कचरा कमी करणे, यासह आरोग्य विषयक उपाययोजना करण्यात येत आहेत.

- Advertisement -

या अंतर्गत महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्रोफेसर कॉलनी चौकातील दुकाने, हॉटेल्सची तपासणी केली. यात प्लास्टिक पिशव्या वापरणार्‍या रूचिरा स्वीट्स, हॉट चिप्स, अक्किज बर्गर कॅफे, बॉम्बे ग्रिल कॅफे, जाधव वडेवाले या पाच आस्थापनांना प्रत्येकी 5 हजार रुपये याप्रमाणे 25 हजार रुपये दंड करण्यात आला. तसेच 15 किलो प्लास्टिकही जप्त करण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत स्वच्छता निरीक्षक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

दर रविवारी सकाळी 1 तास घर व कॉलनीमध्ये स्वच्छता मोहीम राबवून पाणी साचणार्‍या ठिकाणी उपाययोजना करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या सर्व अभियानात व मोहिमेत नागरिकांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न आहे. नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे, आपले शहर स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी, आपल्या कुटुंबाला साथीच्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त डांगे यांनी केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...