Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रModi In Pune : पंतप्रधान मोदींसाठी बनविलेल्या शाही फेट्यावरची राजमुद्रा काढली

Modi In Pune : पंतप्रधान मोदींसाठी बनविलेल्या शाही फेट्यावरची राजमुद्रा काढली

पुणे | Pune

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज पुणे (Pune) दौऱ्यावर आहेत. मोदी तब्बल पाच तास आज पुण्यात असणार आहेत.

- Advertisement -

या दरम्यान ते विविध कार्यक्रमात सहभाग घेणार आहेत. यात पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) आवारातील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याचे अनावरण, पुणे मेट्रोचे (Pune Metro) उदघाटन, पीएमपीएलच्या १०० ई-बस (PMPL E-bus) आणि ई-बस डेपोचं लोकार्पण, एमआयटी (MIT) महाविद्यालयाच्या प्रांगणात मोदींची सभा असणार आहे.

दरम्यान पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी खास फेटा तयार करून घेतला आहे. या फेट्यावर आता काँग्रेसनं (Congress) आक्षेप घेतला होता. विरोधानंतर फेट्यावरील राजमुद्रा (Rajmudra) हटवण्यात आली आहे.

काँग्रेस (COngress) नेते मोहन जोशींनी (Mohan Joshi) म्हटलं होत की, त्या फेट्यामध्ये महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर करण्यात आलेला आहे. राजमुद्रा ही महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक असून, महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भाजपतर्फे सातत्याने अपमान सुरु असून राजमुद्रा असलेला फेटा वापरून भाजपने हेतुपुरस्सर या अपमानाची मालिका सुरु ठेवल्याचे दिसते.

तसेच, पंतप्रधान मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे करण्याचा हा प्रकार निषेधार्ह असून कॉंग्रेसचा फेट्यावर राजमुद्रा वापरण्यास विरोध आहे. तरी सदरचा फेटा घालण्यात येऊ नये असं त्यांनी म्हटलं होतं.

- Advertisment -

ताज्या बातम्या