Friday, November 15, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमी सभेला नाही, तर थेट शपथविधीचं…..पंतप्रधान नरेंद्र मोदी

मी सभेला नाही, तर थेट शपथविधीचं…..पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विधानसभा निवडणूक -२०२४ साठीची सभा आज रात्री मुंबईतील शिवाजी पार्क वर पार पडली. सिद्धिविनायक, मुंबादेवी आणि महालक्ष्मीच्या चरणी प्रणामकरत तसेच क्रांतीगुरु लहुजी वस्ताद यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. येणारया २३ तारखेला नक्कीच महायुतीचे सरकार राज्यात निवडून येणारच असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. मी सभेला नाही तर आज तुम्हाला महायुतीच्या शपथविधीचं निमंत्रण देण्यासाठी इथे आलो आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी सर्वांना शपथविधीचं निमंत्रण दिलं.

- Advertisement -

या वेळी पंतप्रधान मोदी यांनी महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि काँग्रेसवर निशाणा साधला.मी संपूर्ण राज्याचा दौरा केला आहे. मी आज आमच्या मुंबईत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा आशीर्वाद महायुतीसोबत आहे. आज एकच आवाज आहे, भाजप महायुती आहे तर गती आहे. तरंच महाराष्ट्राची प्रगती आहे. महाराष्ट्रातून चिंतनाची नवी धारा निघाली आहे. संतांनी दिशा दाखवली. छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याचा संकल्प घेतला. टिळकांनी देशभक्ती दाखवली असं नरेंद्र मोदी म्हणाले.

मविआसाठी देशापेक्षा पक्ष मोठा आहे. भारताच्या उपलब्धीवर प्रश्न उपस्थित करतात. दशकांपासून मराठीला अभिजात दर्जा मिळवून दिला नाही. मविआच्या राजकारणापासून आणि त्यांच्यापासून सावधान राहायचे आहे. महायुती स्वप्नांना पूर्ण करणारे बंधन आहे. मध्यमवर्ग स्वप्न पूर्ण होत आहेत. आम्ही स्टार्टअप इंडिया सुरु केला मुंबईत मोठ्या प्रमाणात स्टार्टअप येत आहेत. असं नरेंद्र मोदी म्हणाले.

लाखो कोटी रुपयांचं काम मुंबईत सुरु आहे. महामार्ग, मेट्रो,विमानतळ वेगाने कामं होत आहेत. देशात काँग्रेसचं सरकार मिलता मुंबई त्यामुळे मागे गेली. मुंबईचा स्वभाव आहे इमानदारी आणि मेहनत. मात्र काँग्रेसने भ्रष्टाचार, अडथळे आणणे हे काम केलं. अटल सेतू, मेट्रोचा विरोध हे करत होते.अशी टीका मोदींनी केली.

येणारया २३ तारखेला नक्कीच महायुतीचे सरकार राज्यात निवडून येणारच असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. व थेट मी आजच तुम्हाला महायुतीच्या शपथविधीचं निमंत्रण देण्यासाठी आलो आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी सर्वांना शपथविधीचं निमंत्रण दिलं.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या