Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यापंतप्रधान मोदी आज मुंबई दौर्‍यावर

पंतप्रधान मोदी आज मुंबई दौर्‍यावर

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) आज (दि.10) एक दिवसाच्या मुंबई दौर्‍यावर येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ( Chhatrapati Shivaji Maharaj Terminus)येथे आयोजित कार्यक्रमात ‘वंदे भारत ट्रेन’ला ( Vande Bharat Train)मोदी हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर मरोळ येथे दाऊदी बोहरा समाजाच्या नवीन कॅम्प्ससचे मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होईल. मोदींच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेत प्रचंड वाढ करण्यात आली आहे.

- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अलीकडच्या काळातील हा दुसरा मुंबई दौरा आहे. जानेवारी महिन्यात मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी ते मुंबईत आले होते. त्यानंतर आज पुन्हा मोदी मुंबईत येत आहेत. दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांचे मुंबई विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर हेलीकाँप्टरने दक्षिण मुंबईतील नौदलाच्या आयएनएस शिक्रावर येतील. तेथून पावणे तीनच्या सुमारास छत्रपती शिवाजी टर्मिनसवर येतील.

येथील प्लँटफाँर्म क्रमांक आठवर आयोजित कार्यक्रमात मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी या मार्गावरील वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान मोदी हे हिरवा झेंडा दाखवतील. या कार्यक्रमानंतर मोदी हे आयएनएस शिक्रा तळावरून पुन्हा मुंबई विमानतळावर रवाना होतील. विमानतळावरून रस्ते मार्गे ते दुपारी साडेचार वाजता मरोळ येथे पोहचतील. तेथे दाऊदी बोहरा समाजाच्या अल्जामिया-तुस-सैफियाहच्या या नवीन कॅम्पससचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार होईल. या कार्यक्रमानंतर संध्याकाळी सहा वाजता मुंबई विमानतळावरून ते पुन्हा दिल्लीकडे रवाना होतील.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍यामुळे पोलिस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमामुळे वाहतूक संथगतीने होण्याची शक्यता आहे, असे व्टिटमध्ये नमूद केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या