Thursday, September 19, 2024
Homeदेश विदेशपंतप्रधान मोदींचे प्रधान सल्लागार सिन्हा यांचा राजीनामा

पंतप्रधान मोदींचे प्रधान सल्लागार सिन्हा यांचा राजीनामा

नवी दिल्ली –

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सल्लागार पी.के सिन्हा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपण वैयक्तिक

कारणास्तव राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. नृपेंद्र मिश्रा यांच्या राजीनाम्यानंतर 2019 पासून पी.के सिन्हा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्य सल्लागाराची जबाबदारी सांभाळत होते. सोमवारीच पी.के सिन्हा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे समजते.

माजी कॅबिनेट सचिव पी.के सिन्हा यांची 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. सिन्हा यांची पंतप्रधान कार्यालयात ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी (ओएसडी) म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, या राजीनाम्याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर त्याचे नाव अजूनही दिसते आहे.

पी.के सिन्हा यांनी अलाहाबादमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. 2015 मध्ये केंद्र सरकारने कॅबिनेट सचिव पी.के सिन्हा यांचा कार्यकाळ एका वर्षासाठी वाढविला होता. कॅबिनेट सेक्रेटरीचा कार्यकाळ हा साधारण दोन वर्षांचा असतो. यूपी केडरचे आयएएस अधिकारी पी.के सिन्हा पूर्वी ऊर्जा सचिव होते. 1977-78 बॅचच्या सचिवांमध्ये ते सीनियर होते आणि म्हणूनच त्यांची ज्येष्ठता लक्षात घेता त्यांची कॅबिनेट सचिवपदी नेमणूक करण्यात आली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या