Wednesday, December 4, 2024
Homeब्रेकिंग न्यूजPM Narendra Modi: काँग्रेस संविधानाच्या नावावर स्वतःचे लाल पुस्तक वाटते…; PM मोदींची...

PM Narendra Modi: काँग्रेस संविधानाच्या नावावर स्वतःचे लाल पुस्तक वाटते…; PM मोदींची काँग्रेसवर सडकून टीका

नांदेड | Nanded
काँग्रेसने फसवणुकीचे आपले सर्व रेकॉर्ड तोडले आहे. काँग्रेसचे लोक संविधानाच्या नावावर स्वतःचे लाल पुस्तक वाटत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी नांदेड येथील प्रचारसभेत बोलताना केली. कश्मीरमध्ये तिरंगा नव्हे तर वेगळा झेंडा आणि वेगळा कायदा करून संविधानाचा अपमान काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात केला आहे. त्यांनी ७५ वर्ष दोन संविधान चालविण्याचे काम काँग्रेसवाल्यांनी केले. ३७० ची भिंत उभारण्याचे काम त्यांनी केले. पण, आम्ही सत्तेत आल्यानंतर या कलमाला जमीनीत गाडण्याचे काम केले,असेही मोदी म्हणाले.

नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण, मंत्री हेमंत पाटील, खासदार डॅा.अजित गोपछडे, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे भाजपचे उमेदवार डॉ.संतुकराव हंबर्डे, नांदेड उत्तरचे शिवसेनेचे उमेदवार बालाजी कल्याणकर, लोहा येथील राष्ट्रवादीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर आदींची उपस्थिती होती.

- Advertisement -

विकसित भारत तेव्हाच शक्य आहे; जेव्हा महाराष्ट्राचा विकास होईल. महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंब समृद्ध होईल. केंद्रातील आणि राज्यातील महायुतीचे सरकार तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी काम करत आहे. त्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करून तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करा, असे आवाहन पीएम मोदी यांनी नांदेड येथील सभेत केले.

दिल्लीत मोदी सरकार आले, पण या आनंदात नांदेडचे फुल नव्हते. त्यामुळे आता मी दिल्लीला नांदेडमधून कमळाचे फुल पाठविण्याचे आवाहन करण्यासाठी आलो आहे. तुमच्याकडून मोदीसाठी ही मदत मागत असून त्याचबरोबर महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी महायुतीला आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांचे मुळ काँग्रेस असून त्यांनी येथील शेतकऱ्यांच्या सुखदुखाची कधीच परवा केली नाही. मागील दहा वर्षात भाजप, महायुतीने सिंचनासाठी पुढाकार घेतला. त्यातही अडीच वर्ष बिघाडी सरकारने या योजनांना ब्रेक लावण्याचे काम केले. आज नदी जोड प्रकल्प आणि मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाडा दुष्काळमुक्त होईल तर ८० हजार कोटींच्या गुंतवणुकीतून येथे हजारो युवकांच्या हाताला रोजगार मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या