Friday, May 17, 2024
Homeमुख्य बातम्यापंतप्रधान मोदी ११ डिसेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर; 'हे' आहे कारण

पंतप्रधान मोदी ११ डिसेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर; ‘हे’ आहे कारण

मुंबई | Mumbai

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांचा महत्वकांशी प्रकल्प असलेला नागपूर मेट्रो (Nagpur Metro) आणि समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Highway) लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी होणार असून त्यासाठी ते नागपूर (Nagpur) दौऱ्यावर येणार आहेत…

- Advertisement -

मागील काही महिन्यांपासून नागपूर मेट्रो आणि समृद्धी महामार्गाचे काम जोरात सुरू होते. त्यानंतर आता ते काम पूर्ण झाले असून या दोन्ही कामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी नागपूरमध्ये येत आहेत. यासाठी समृद्धी महामार्गाच्या प्रशासनाकडून १० ते १५ हजार लोक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तर बांधकाम कंपनीकडून (Construction Company) समृद्धी महामार्गाच्या सर्व टोलचे हस्तांतरण पूर्ण करण्यात आले असून वायफळ टोलप्लाझा येथे लोकार्पण सोहळा होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच पंतप्रधान मोदी नागपूर दौऱ्यावर येत असल्याने राज्यासह भाजपमधील नेत्यांच्या नजरा या कार्यक्रमाकडे लागून राहिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या