Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्या"महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांची..."; पंतप्रधान मोदींनी केले मुख्यमंत्री शिंदेंचे कौतुक

“महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांची…”; पंतप्रधान मोदींनी केले मुख्यमंत्री शिंदेंचे कौतुक

नवी दिल्ली | New Delhi

काल (दि.२२ जुलै) रोजी दुपारच्या सुमारास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे व नातू रुद्रांश यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) सहकुटुंब भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये महाराष्ट्रातील प्रलंबित कामांसोबत अनेक विषयांवर चर्चा झाली. यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी ट्विट करत करत पंतप्रधान मोदींनी भेटीसाठी वेळ दिल्याने त्यांचे आभार मानले होते.

- Advertisement -

अखेर ठरलं! अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेने उरकला साखरपुडा; ‘या’ तारखेला अडकणार लग्नबंधनात

त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री शिंदेंच्या या ट्विटला मराठीमधून रिप्लाय देत त्यांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ट्विटमध्ये (Tweet) म्हटले आहे की, ‘महाराष्ट्राचे गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला. महाराष्ट्राच्या (Maharashtra) प्रगतीसाठीची त्यांची तळमळ आणि विनम्र स्वभाव कौतुकास्पद आहे’, असे त्यांनी म्हटले.

Nashik : मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून समृद्धीच्या टोलची तोडफोड; अमित ठाकरेंचा ताफा अडवल्याने कार्यकर्ते संतप्त

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करत म्हटले होते की, ‘देशाचे पंतप्रधान म्हणून कणखर आणि सक्षम असलेल्या मा.नरेंद्र मोदीजी यांनी आज माझे वडील, पत्नी, मुलगा, सून आणि नातू यांच्यासह मला सदिच्छा भेटीला बोलावून आपलेपणाने विचारपूस केली. माझ्या कुटुंबाशी निवांत गप्पा मारल्या. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला. पंतप्रधानांची आपुलकी, आशीर्वादाचा हात आणि आस्था नवे बळ देणारी आहे’. तसेच महाराष्ट्रातील जनतेचे आयुष्य सुखकर करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विकासकामांबाबत पंतप्रधान मोदींनी यावेळी चर्चा केल्याची माहिती देखील मुख्यमंत्री शिंदेंनी ट्विटद्वारे दिली होती.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

IND A vs PAK A : आज महामुकाबला! भारत-पाकिस्तानमध्ये रंगणार फायनलचा थरार… कधी अन् कुठे पहायचा सामना?

- Advertisment -

ताज्या बातम्या