Wednesday, February 4, 2026
Homeदेश विदेशAir India Plane Crash: एअर इंडिया विमान अपघातास्थळी पोहोचले पंतप्रधान मोदी; बचावलेल्या...

Air India Plane Crash: एअर इंडिया विमान अपघातास्थळी पोहोचले पंतप्रधान मोदी; बचावलेल्या एकमेव जखमीची विचारपूस, दुर्घटनास्थळाची केली पाहणी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
गुजरातमध्ये झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत २६५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. विमानात २४२ प्रवासी, दोन पायलट आणि १० क्रू मेंबर्स होते. हे विमान अहमदाबादहून लंडनला (गॅटविक) जाणार होते. उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच विमान मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळले. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी, तसेच अनेक भारतीयांसह परदेशी प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघाताच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दुर्घटनास्थळाची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन अपघातात अश्चर्यकारक वाचलेल्या एकमेव व्यक्तीची भेट घेत विचारपुस केली. यावेळी त्यांच्यासोबत गृहमंत्री अमित शाह हे देखील उपस्थित होते.

एअर इंडियाचे AI -171 बोईंग ड्रीमलाईनर या विमानाचा अहमदाबादमध्ये टेक ऑफ घेतल्यानंतर काही सेकंदातच भीषण अपघात झाला. हे विमान विमानतळाजवळच असलेल्या मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये कोसळले. या अपघातात आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. विमानात २४२ जण होते. ज्यात २ पायलट आणि १० क्रू मेंबर होते. एअर इंडियाच्या माहितीनुसार, विमानात असलेल्या २३० प्रवाशांपैकी १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, १ कॅनेडियन आणि सात पोर्तुगीज नागरिक होते.

- Advertisement -

YouTube video player

आज सकाळी पंतप्रधान मोदी विशेष विमानाने अहमदाबाद येथे दाखल झाले. तेथून ते थेट विमान कोसळलेल्या दुर्घटनास्थळी पोहोचले. त्यांनी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बचावकार्य, मदतकार्य आणि तपासाची सविस्तर माहिती घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरवारी झालेल्या दुर्दैवी अपघाताची माहिती मंत्री आणि अधिकाऱ्यांकडून घेतली. पंतप्रधान मोदींसोबत नागरी उड्डाण मंत्री रामनोहन नायडू, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गृहमंत्री हर्ष संघवी आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील उपस्थित होते. पंतप्रधानांनी विमान ज्या वसतिगृहावर कोसळले त्या वसतिगृहालाही भेट दिली. या भीषण अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह एकूण २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी २४१ जण विमानात प्रवास करत होते. उर्वरित मृत मेघनानगरमध्ये विमान कोसळले तेव्हा घटनास्थळी उपस्थित होते.

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताच्या दुर्घटनास्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातानंतरच्या परिस्थितीची आणि बचाव कार्याची अधिकाऱ्यांकडून सविस्तर बारकाईने माहिती घेतली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी दुर्घटनेत आश्चर्यकारकरीत्या बचावलेल्या एकमेव प्रवाशाची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.

एअर इंडियाने अहमदाबाद, मुंबई, दिल्ली आणि गॅटविक विमानतळांवर मदत केंद्रे सुरू केली आहेत जेणेकरून फ्लाइट क्रमांक AI-171 मधील प्रवाशांच्या कुटुंबिय आणि नातेवाईकांना मदत करता येईल.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...