Friday, April 25, 2025
Homeनगरपोहेगाव-सोनेवाडी रोडलगत अपघातात महिलेचा मृत्यू

पोहेगाव-सोनेवाडी रोडलगत अपघातात महिलेचा मृत्यू

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव-सोनेवाडी रस्त्यावर नऊचारी जवळ शेतीचे काम आवरून घरी येत असताना पोहेगावच्या दिशेने आलेल्या डंपरने महिलेला चिरडले. यात महिलेचा मृत्यू झाला. नऊचारी परिसरातून शेतातून आपल्या स्कुटीवर तुषार रामदास वाघ आईला पोहेगाव येथे घरी घेऊन चालला होता. रस्त्यावर नऊचारी ओलांडून स्कुटी रोडवर आली असता सोनेवाडीच्या दिशेने आलेल्या डंपरने स्कुटीला जोरदार धडक दिली.

- Advertisement -

यामध्ये वंदना रामदास वाघ (वय 48 वर्ष) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह राहाता ग्रामीण रुग्णालयात नेण्यासाठी अ‍ॅम्बुलन्स झगडे फाट्या मार्गे नऊचारी कडे येत असताना पाऊस झाल्याने खडीकरण झालेल्या रस्त्यावर उलटली. अ‍ॅम्बुलन्सने देखील दोन पलट्या मारल्या. नंतर दुसर्‍या अ‍ॅम्बुलन्सने हा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...