Friday, September 20, 2024
Homeक्राईमNashik Sinnar News : दुचाकीस्वारास मारहाण करून रोकड लुटणाऱ्या टोळीला अटक

Nashik Sinnar News : दुचाकीस्वारास मारहाण करून रोकड लुटणाऱ्या टोळीला अटक

साडेसात लाखांची रक्कम व कार हस्तगत

सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar

- Advertisement -

नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik-Pune Highway) मोहदरी गावाजवळ दुचाकीने जाणाऱ्या एका कंपनीच्या कामगारास चाकुने वार करुन त्याच्याजवळील साडेसात लाखांची रोकड पळवून नेणाऱ्या आरोपींना (Suspected) एमआयडीसी पोलीसांनी (MIDC Police) मोठ्या शिताफिने अटक (Arrested) केली आहे. आरोपींकडून रोकड व गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार हस्तगत करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सागर नंदु चौधरी हे रेडियन्ड कॅश मॅनेजमेंट लि. चेन्नई या कंपनीच्या पुणे शाखेमध्ये कॅश इक्सिक्युटीव्ह म्हणून नोकरीस (Job) असून त्यांच्याकडे कंपनीचे सिन्नर तालुक्याचे (Sinnar Taluka) क्षेत्र आहे. शहर व ग्रामीण भागातुन मॉल, व्यावसायिकांनी सदर कंपनीसोबत त्यांच्याकडील बँक भरणा करावयाची रक्कम व बँकेत भरण्यासाठी तसेच ज्या बँकांनी त्यांच्याकडे जमा होणारे चेक हे इतर बॅकेत जमा करण्यासाठी करार केलेला आहे. चौधरी ही रोकड व चेक दररोज जमा करुन नाशिक (Nashik) येथील बँकेत जमा करण्याचे काम करतात.

हे देखील वाचा : Nashik Crime News : सोनसाखळी चोरांकडून १४ गुन्हे उघडकीस

२९ जुलै रोजी चौधरी यांनी तालुक्यातील मॉल, व्यावसायिकांकडून त्यांचा भरणा करण्यासाठी असलेली ७ लाख ५३ हजार ४१६ रुपयांची रोकड घेऊन आपली मोटार सायकल क्र.एम.एच. २८ वाय. ०८३४ वरुन नाशिकला जात होते. मोहदरी घाटातून जात असतांना त्यांच्या मागे दोन विना क्रमांकाच्या मोटार सायकलवर आलेल्या सहा आरोपींपैकी एका मोटार सायकलवर मागे असलेल्या आरोपीने चौधरी यांच्या पाठीवर चाकुने वार करुन दुखापत केली. तसेच इतर आरोपींनी त्यांच्याकडील हॉकी स्टीकने व लाथाबुक्यांनी चौधरी यांना मारहाण करुन त्यांच्याकडील रोकड असलेली बॅग घेवुन नाशिककडे पळून गेले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधिक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश पालवे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजु सुर्वे यांच्या मार्गदर्शानाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक यशवंत बाविस्कर यांनी पथकासह घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे व स्थानिक गुन्हे शाखेचे प्रत्येकी एक पथक नेमण्यात आले. गुन्हाचा तपास सुरु असताना एमआयडीसी पोलीसांनी (Police) नाशिक-सिन्नर रोडवरील सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्हीमध्ये चौधरी यांचा पाठलाग करताना कोणीही दिसून आले नाही. त्यामुळे आरोपी यांना चौधरी नेहमी पैसे घेऊन जात असल्याबाबत माहिती असावी म्हणून ते मोहदरी घाटात फिर्यादीची वाट पाहत थांबून असावे अशी शक्यता पोलिसांना वाटली.

हे देखील वाचा : Nashik Crime News : पोलिसांची अठरा मद्यपी चालकांवर कारवाई; परवाने निलंबित

त्याबाबत चौकशी करताना सदरचा गुन्हा हा शिंदे-पळसे येथील अमोल अरुण ओढेकर व शुभम विजय पवार यांनी केल्याची गुप्त माहिती पोलिसांना कळाली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे दिली. मात्र, पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी आपले साथीदार महेश सतिश पठारे, सागर एकनाथ चव्हाण दोघे रा. विंचुर ता. निफाड, गौरव प्रभाकर भवर, गणेश रमेश गायकवाड दोघे रा. मानोरी खुर्द ता. निफाड, प्रसाद आनंदा गायकवाड रा. मानोरी बु. ता. येवला व सुरज प्रकाश पाकळ रा. शिर्डी यांच्या मदतीने दोन मोटारसायकल व मारुती इर्टिका कार वापरुन सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच गुन्ह्यातील रोख रक्कम आठ जणांमध्ये वाटून घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक (Arrested) करुन त्यांच्याकडून गुन्ह्यातील लुटलेली रोख रक्कम व वाहनासह एकुण ७ लाख ७९ हजारांची रिकव्हरी केली आहे. दरम्यान, पोलिस निरीक्षक यशवंत बाविस्कर, उपनिरिक्षक किशोर पाटील, अंमलदार भगवान शिंदे, योगेश शिंदे, नवनाथ चकोर, प्रकाश उंबरकर, प्रशांत सहाणे, जयेश खाडे, तांत्रिक विश्लेषण विभागाचे प्रदिप बहीरम, हेमंत गिलबीले यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकिस आणला. तसेच गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक किशोर पाटील हे करीत आहेत.

हे देखील वाचा : Nashik News : खड्ड्यातील पाण्यात बुडून दोन लहान मुलांचा मृत्यू

आरोपी अट्टल गुन्हेगार

सदर गुन्ह्यातील आरोपी महेश सतिश पठारे यांच्यावर लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये आर्म अॅक्ट व मारहाण असे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. तसेच सुरज प्रकाश पाकळ याच्यावर देखील अहमदनगर जिल्ह्यात फसवणुक करणे, मारहाण करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळेच त्यांनी हिम्मत करत थेट दरोड्यासारखा गुन्हा केल्याचे समोर आले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या