Saturday, November 9, 2024
Homeक्राईमNashik Crime News : मद्य डिलर अटकेत; पोलिसांनी पाठलाग करुन मिळविला ताबा

Nashik Crime News : मद्य डिलर अटकेत; पोलिसांनी पाठलाग करुन मिळविला ताबा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) स्काॅर्पिओला धडक देत चालक जवानाचा खून (Murder) केल्याच्या गुन्ह्यातील अटक (Arrested) केलेल्या दाेघा सराईतांचा मुख्य साथीदार व सिल्व्हासा येथील लिकर डिलरला अखेर अटक झाली आहे. राहुल ज्योती सहाणी (वय ४४, रा. नारोली रोड, सिल्वासा, गुजरात) असे अटकेतील डिलरचे नाव असून ग्रामीण पाेलिसांच्या स्थानिक गुन्हेशाखेने (दि.१२) सापळा रचून छापा टाकला. ताे घरात असताना त्याला पाेलिसांची कुणकुण लागली. त्यामुळे त्याने मागील दाराने साडीच्या सहाय्याने खाली उतरुन शेतात पळ काढला. मात्र, पाेलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला शेतातून ताब्यात घेत अटक केली. 

- Advertisement -

हे देखील वाचा : Accident News : नाशिकमध्ये आयशर ट्रक आणि कारचा भीषण अपघात चौघांचा जागीच मृत्यू

याबाबत अधिक माहिती अशी की,  ७ जुलै राेजी रात्री अवैधरित्या मद्याची वाहतूक करणाऱ्याया तस्करांच्या क्रेटा कारचालकाने पाठलाग करणाऱ्या पाेलिसांसह (Police) उत्पादन शुल्क विभागाच्या सरकारी वाहनास जाणीवपूर्वक धडक देत अपघात (Accident) घडविला. त्यात स्काॅर्पिओ उलटून उत्पादन शुल्क विभागाचे चालक जवान कैलास कसबे ठार झाले हाेते, तर अन्य तिघे जखमी झाले हाेते. या घटनेनंतर मद्यतस्करांसह त्यांचे डिलर व इतर संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करुन शाेध घेण्यात आला. तेव्हा क्रेटा कार चालक देवीश कांतीलाल पटेल (वय-३७, रा. चिंचवाडा, ता. जि. वलसाड) याने अपघात करुन खून केल्याचे उघड झाल्याने त्याला एलसीबीने अटक केली.

हे देखील वाचा : “आमदारांना शेअर मार्केटसारखा भाव, कुणाला २५ कोटी तर कुणाला…”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

तर त्याचा साथीदार अश्पाक अली मोहम्मद शेख (वय २२, रा. युनिक अपार्टमेंट, दर्गारोड, नवसारी, गुजरात) यालाही अटक करुन तस्करीसाठी वापरलेली क्रेटा ही दमन येथून हस्तगत केली. त्यानंतर या तस्करीचा मास्टरमाईंड शाेधण्याचे आदेश पाेलीस अधिक्षक विक्रम देशमाने यांनी दिले हाेते. त्यानुसार तांत्रिक विश्लेषण व इतर माहिती काढून मेन डिलरचा शाेध सुरु झाला. ताे सिल्व्हासा येथील घरी असल्याची माहिती कळाली. त्यानुसार पथकाने (दि. १२) सापळा रचला. तेव्हा पाेलीस आल्याचे समजताच तो घरातील एसीच्या C डेकमधून पाठीमागील बाजूस साडी बांधून खाली उतरला. यानंतर घरामागील जंगलामध्ये पळून गेला. तेव्हा अंमलदारांनी जंगलातील चिखलामध्ये पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

हे देखील वाचा : विधानपरिषदेच्या निकालानंतर अजित पवारांची दिल्लीवारी; अमित शाहांची घेतली भेट, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत खलबतं?

साहनी मुख्य डिलर 

राहुल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर गुजरात राज्यात सोलगड, पार्डी, वलसाड, नवसारी, वलोड, नानापोडा याठिकाणी प्रोहिबिशनचे ०७ गुन्हे दाखल आहेत. सहायक अधिक्षक सुरज गुंजाळ यांच्या सुचनांनुसार ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकातील उपनिरीक्षक खाडे, हवालदार  दिपक गुंजाळ, शांताराम घुगे, पोलीस नाईक प्रकाश कासार, रमेश चव्हाण, देवा गोविंद, नरेंद्र कोळी, तसेच तांत्रीक विश्लेषण विभागाचे पोलीस नाईक प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले, भाउसाहेब टिळे यांनी ही कामगिरी केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या