Sunday, June 30, 2024
HomeनाशिकNashik Crime News : एमडीचा धंदा तेजीतच; नाशकात विक्री करणारे दाेघे अटकेत

Nashik Crime News : एमडीचा धंदा तेजीतच; नाशकात विक्री करणारे दाेघे अटकेत

दीड लाखांचे मेफेड्राेन जप्त 

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

एमडी ड्रग्जच्या विळख्यातून नाशिक शहराची (Nashik City) मुक्तता अद्याप झाली नसून ठाण्यातून नाशकात ड्रग्ज (Drugs) आणत त्याची पाच हजार रुपये ग्रॅमने विक्री करणाऱ्या दोघा ड्रग्ज पेडलर्सला पोलिस आयुक्तालयाच्या विशेष शाखेने अटक (Arrested) केली आहे.या कारवाईत दीड लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले असून संशयित पेडलरवर सरकारवाडा पोलिसांत (Police) एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Video : “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल…” संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे त्र्यंबकेश्वरमधून पंढरपूरकडे प्रस्थान

याबाबत अधिक माहिती अशी की, धीरज धनराज चांदनानी (वय २४, रा. गोगटे यांच्या मालकीच्या घरात भाडेतत्वावर, श्रीरामवाडी, एम. जी. रोड, नाशिक) आणि रोहित सुनिल अहिरराव (वय २७, रा. ७, सुयश अपार्टमेंट, रामकृष्णनगर, मखमलाबाद शिवार, नाशिक) अशी संशयित ड्रग्जपेडलरची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मागील सहा महिन्यांपूर्वी मुंबई पोलिसांनी शिंदे गावातील एमडी ड्रग्ज उत्पादनाचा कारखाना शोधून काढला होता.

हे देखील वाचा : Nashik Crime News : बिल्डरने महाविद्यालयीन तरुणास घातला ‘इतक्या’ लाखांचा गंडा

यानंतर नाशिक शहर पोलिसांनी (Nashik City Police) ड्रग्जविरोधी कारवाया करुन एनडीपीएसचे गुन्हे दाखल करुन नाशिक, भिवंडी, सोलापूर, केरळ, वसई, मुंबई येथे संशयित ड्रग्ज डिलर, पेडलरांच्या घरांवर छापे टाकून २० ते २२ संशयितांना अटक केली होती.त्यानंतर, सोलापूर एमआयडीसीतील एमडीचा कारखाना उद्ध्वस्त करुन ड्रग्जचे सिंडिकेट मोडीत काढले होते. यानंतर एमडीची चर्चा कमी होऊन उपलब्धतेत अडथळा येत होता. असे असतानाच, आता शहरातील मुख्य बाजारपेठेजवळच ड्रग्ज विक्रीचा ‘सौदा’ सुरु असल्याचे समोर आले आहे.

हे देखील वाचा : Raj Thackeray : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या समाधीचे राज ठाकरेंनी घेतले दर्शन

दरम्यान, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या आदेशाने विशेष पथक ड्रग्ज विक्री व संशयास्पद गुन्हेगारांचा शोध घेत असतांना विशेष पथकातील हवालदार देवकिसन गायकर, अंमलदार सानप व बागडे यांना बुधवारी रात्री आठ वाजता दोन तरुण रविवार कारंज्या येथील अॅक्सिस बँकेजवळील बालाजी एजन्सीसमोर एमडी विक्री करीता येणार असल्याची माहिती कळाली. त्यांनी ही माहिती वरिष्ठ निरीक्षक जयराम पायगुडे यांना दिली. त्याच्या सूचनेने सहायक निरीक्षक हेमंत नागरे आणि पथकातील उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, श्रेणी उपनिरीक्षक भोई, सहायक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, हवालदार किशोर रोकडे, ताजणे, चव्हाण यांनी सापळा रचून ताब्यात घेतले. दोघांच्या अंगझडतीत १ लाख ६० हजार रुपयांची ३२ ग्रॅम एमडी पावडर आढळली. याबाबत गायकर यांनी फिर्याद दिली असून गुन्ह्याचा तपास सरकारवाडा पोलीस (Sarkarwada Police) करत आहेत.

हे देखील वाचा : अज्ञात समाजकंटकांकडून मोटारसायकलींची जाळपोळ ; इगतपुरी तालुक्यातील घटना

सहा महिन्यांपासून सक्रिय

अटकेतील दाेघे संशयित सराईत असल्याचे समाेर आले असून ते पूर्वी दुसरा कामधंदा करत हाेते. मात्र, मागील सहा महिन्यांपासून दाेघेही परजिल्ह्यातून एमडी ड्रग्ज नाशकात आणत हाेते. तेव्हापासून ते नाशिकमध्ये ठराविक आणि अतिशय घनिष्ट ओळख असलेल्या ग्राहकांना पाच हजार रुपये प्रतिग्रॅमने एमडी ड्रग्ज विक्री करत हाेते. बाहेरुन ड्रग्ज आणताना हे संशयित ३ ते साडेतीन हजार रुपये ग्रॅमने खरेदी करुन दाेन लाख रुपयांपर्यंतचा साठा जवळ ठेवत हाेते, असे तपासात समाेर आले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या