Sunday, October 6, 2024
HomeनाशिकNashik Crime News : भाईगिरी करताे म्हणून काढला काटा

Nashik Crime News : भाईगिरी करताे म्हणून काढला काटा

'त्या' खून प्रकरणाचा उलगडा; दाेघा सराईत मित्रांना अटक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

‘आमच्यावर भाईगिरी करताे, मद्याच्या नशेत वारंवार मारझाेड करताे, या जाचाला कंटाळून संशयित मित्रांनी तडिपार चाेरट्याची निर्घृण हत्या (Murder) केली. गंजमाळच्या (Ganjmal) पंचशीलनगरात घडलेल्या पांडुरंग उर्फ पांड्या शिंगाडे याच्या हत्येच्या कारणाचा अखेर उलगडा झाला असून मुख्य सूत्रधारांसह अल्पवयीन मुलास भद्रकाली पाेलिसांसह (Bhadrakali Police) गुंडाविराेधी पथकाने सातपूर (Satpur) येथून ताब्यात घेतले आहे. दाेघांना न्यायालयाने येत्या १० जुलैपर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : ओळखीचा फायदा घेत तीन काेटींचा गंडा; पाच गुन्हे नाेंद

याबाबत अधिक माहिती अशी की, कैलास नंदू गायकवाड (रा. गंजमाळ), ऋतिक उर्फ लाड्या रामदास गायकवाड (२१, रा. पंचशीलनगर) अशी अटकेतील दाेघांची नावे असून त्यांच्यासोबत असलेल्या एका साडेसाेळा वर्षीय मुलासही ताब्यात घेतले आहे. हे, तिघेही संशयित पांड्याचा खून केल्यानंतर सातपूर भागातील (Satpur Area) फाशीच्या डाेंगर परिसरात मद्यपान करुन ओळख लपवून राहत हाेते, असे तपासात समाेर आले आहे.

हे देखील वाचा : नाशिकमध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासोबत हिट अ‍ॅण्ड रन

जुन्या वादाचा राग मनात धरत वचपा काढण्याच्या इराद्याने तडीपार गुंड व सराईत चाेरटा पांडुरंग उर्फ पांड्या हनुमान शिंगाडे (वय २०) याचा पंचशीलनगर येथील दुर्गा देवी मंदिराजवळील घरात झाेपलेला असताना (दि.४) गुरुवारी पहाटे वरील तिघांनी घरात शिरुन त्याच्यावर धारदार चाॅपर, काेयत्याने पांड्याच्या पाेटावर, हातावर आणि पाठीवर १५ हून अधिक वार करु निर्घृण हत्या केली हाेती. यानंतर संशसित पसार झाले हाेते.

हे देखील वाचा : Nashik Crime News : ड्रग्ज तस्करीचा बाेगस धाक दाखवून इंजिनिअरला ३५ लाखांचा गंडा

त्यानंतर भद्रकाली पोलीस ठाण्याचे (Bhadrakali Police Station) वरिष्ठ पाेलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, पाेलीस निरीक्षक विक्रम माेहिते यांच्या सूचनेने सहायक निरीक्षक वसंत पवार व पथकाने संशयितांचे विविध ठिकाणे पिंजून काढले. त्यात अपयश येत असतानाच दुसऱ्या दिवशी पवार यांच्यासह पथकाने दाेघांना तर, त्याचवेळी समांतर तपास करतांना गुंडा विराेधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर माेहिते व पथकाने तिसऱ्या संशयितास सातपूरच्या फाशीच्या डाेंगर भागातून ताब्यात घेतले.

हे देखील वाचा : Heavy Rain In Mumbai : मुसळधार पावसाचा फटका आमदार आणि मंत्र्यांनाही; मंत्री अनिल पाटील, मिटकरी ट्रॅकवर

दरम्यान, याप्रकरणी मृत पांडुरंगचा भाऊ विकास शिंगाडे याने दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात हल्लेखोरांविरूद्ध भारतीय न्याय संहिता कलम (बीएनएस) १०३(१) व ३(५), ३५१(२) (३) नुसार गुन्हा दाखल आहे. संशयितांचा ताबा मिळताच मुख्य सूत्रधार कैलासकडे सखोल चौकशी केली असता त्याने तिसरा साथीदार ऋतिकचे नाव उघड केले. याबाबत अधिक तपास एपीआय पवार करत आहेत.

हे देखील वाचा : संपादकीय : ८ जुलै २०२४ – कर्तव्येही महत्वाची!

वैताग वाढल्याने आखला प्लॅन

मृत पांड्या हा संशयितांचा जवळचा मित्र हाेता. काहीही चाेरी, मारहाण करायची असेल तर चाैघे साेबत करत हाेते. पण, त्यात गेल्या काही महिन्यांपासून पांड्या कैलास, ऋतिक व इतर संशयितांवर भाईगिरी करुन वरचढपणा सिद्ध करत हाेता. त्यातच ताे मद्याच्या नशेत असतांना नेहमीच तिघांवर वर्चस्व दाखवून हाणामारी करुन श्रीमुखात भडकवत असायचा. हाच वैताग असह्य झाल्याने संशयितांनी त्याचा वचपा काढण्याच्या हेतूने त्याच्या घरात शिरुन ताे झाेपेत असतानाच यमसदनी धाडले.

हे देखील वाचा : Video: किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश्य पाऊस; धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल

पांड्यासह गायकवाड सराईत

पाड्यावर चाेरीचे पाच पेक्षा अधिक गुन्हे दाखल हाेते. तर इतर शरीर व मालाविरुद्धचे गुन्हे दाखल असल्याने ताे परिमंडळ एक हद्दीतून तडिपार करण्यात आला हाेता. दरम्यान, कैलास गायकवाड याच्यावरही चाेरीचे चार ते पाच गुन्हे दाखल असून ऋतिकवर मुंबईनाका पाेलिसांत मारहाणीसंदर्भाने गुन्हा नाेंद आहे. त्यामुळे या चाेर गँगमधील अंतर्गत धुसफुशीतूनच हा खून झाला आहे. तर, गुन्ह्यात वापरलेल्या हत्यार जप्त करण्याची कारवाई पाेलिसांनी सुरु केली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

 

- Advertisment -

ताज्या बातम्या