अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्हा पोलीस दलातील 37 पोलीस अधिकार्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आहेत. 16 पोलीस निरीक्षक, 11 सहायक पोलीस निरीक्षक, 10 पोलीस उपनिरीक्षक यांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, कोपरगाव शहर, संगमनेर शहर, अकोले, घारगाव, वाहतुक नियंत्रण शाखा शिर्डी, सोनई, शेवगाव, श्रीगोंदा, सायबर, भिंगार कॅम्प या पोलीस ठाण्यांना नवीन प्रभारी अधिकारी मिळाले आहेत.
पोलीस अधिकार्यांची नावे (कंसात सध्याची नेमणूक व बदली झालेले ठिकाण)- पोलीस निरीक्षक समाधान नागरे (नियंत्रण कक्ष ते शेवगाव), दिगंबर भदाणे (शेवगाव ते घारगाव), संतोष खेडकर (घारगाव ते जिल्हा विशेष शाखा), भगवान मथुरे (संगमनेर शहर ते कोपरगाव शहर), बापूसाहेब महाजन (जिल्हा विशेष शाखा ते संगमनेर शहर), दौलत जाधव (भरोसा सेल ते जिल्हा विशेष शाखा), प्रदीप देशमुख (कोपरगाव शहर ते वाहतूक नियंत्रण शाखा शिर्डी), राजेंद्र इंगळे (वाहतूक नियंत्रण शाखा शिर्डी ते अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष), नंदकुमार दुधाळ (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष ते वाचक पोलीस निरीक्षक पोलीस अधीक्षक कार्यालय), मोरेश्वर पेंदाम (नगर शहर वाहतुक नियंत्रण शाखा ते सायबर सेल), बाबासाहेब बोरसे (जिल्हा विशेष शाखा ते नगर शहर वाहतुक शाखा), नितिनकुमार चव्हाण (वाचक पोलीस निरीक्षक पोलीस अधीक्षक कार्यालय ते आर्थिक गुन्हे शाखा), मोहन बोरसे (नियंत्रण कक्ष ते अकोले), किरण शिंदे (नियंत्रण कक्ष ते श्रीगोंदा), गुलाबराव पाटील (अकोले ते नियंत्रण कक्ष), ज्ञानेश्वर भोसले (श्रीगोंदा ते नियंत्रण कक्ष).
सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर (पाथर्डी ते भिंगार कॅम्प), योगेश राजगुरू (भिंगार कॅम्प ते नियंत्रण कक्ष), आशिष शेळके (सोनई ते कोपरगाव शहर), विजय माळी (कर्जत ते सोनई), कुणाल सपकाळे (नियंत्रण कक्ष ते अर्ज शाखा), रमिझ मुलाणी (नव्याने हजर ते कर्जत), मंगेश गोंटला (जळगाव येथून बदली आदेशाधिन ते जामखेड), गणेश वारूळे (नंदुबार येथून बदली आदेशाधिन ते वाचक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शिर्डी), विवेक पवार (ड्रायल मॉनिट्रेनिंग सेल ते वाचक अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय नगर), संदीप हजारे (शिर्डी ते वाहतुक नियंत्रण शाखा शिर्डी), कल्पेश दाभाडे (नियंत्रण कक्ष ते वाचक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय संगमनेर).
पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मोरे (भिंगार कॅम्प ते लोणी), योगेश शिंदे (लोणी ते भिंगार कॅम्प), तुळशिराम पवार (नियंत्रण कक्ष ते बेलवंडी), प्रियंका आठरे (अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष ते भरोसा सेल), निवांत जाधव (नक्षल सेल ते व्हीआयपी प्रोटोकॉल शनिशिंगणापुर मंदिर), उमेश पतंगे (नियंत्रण कक्ष ते ड्रायल मॉनिट्रेनिंग सेल), गजेंद्र इंगळे (नाशिक ग्रामीण येथून बदली आदेशाधिन ते वाचक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयन नगर शहर), दीपक पाठक (नाशिक ग्रामीण येथून बदली आदेशाधिन ते वाचक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शेवगाव), सतिष डौले (नाशिक ग्रामीण येथून बदली आदेशाधिन ते वाचक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय श्रीरामपूर), योगेश चाहेर (नाशिक ग्रामीण येथून बदली आदेशाधिन ते सायबर सेल).