Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रआंबोली घाटातील दरीत कोसळून छत्तीसगडच्या पोलिसाचा मृत्यू

आंबोली घाटातील दरीत कोसळून छत्तीसगडच्या पोलिसाचा मृत्यू

सिंधुदुर्ग | Sindhudurg

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील आंबोली घाटात ३०० फूट खोल दरीत कोसळून छत्तीसगड रिझर्व पोलीस (Chhattisgarh Police) दलात कर्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. मितीलेश पॅकेरा असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

- Advertisement -

मितीलेश पॅकेरा हे कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 (Karnataka Election) च्या बंदोबस्तासाठी कर्तव्यावर आले होते. या वेळी सुट्टी मिळाल्याने ते पर्यटनासाठी म्हणून अंबोली (Amboli Ghat) येथे आले होते. दरम्यान, लघुशंकेसाठी घाटात खाली उतरलेले मीतिलेस पॅकेरा दरीत कोसळले. शनिवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला.

शिर्डीत ६ हॉटेलवर छापा, १५ पीडित मुलींची सुटका

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगड रिझर्व पोलिसांची एक तुकडी कर्नाटक-रायबाग या ठिकाणी बंदोबस्ताला आली होती. यादरम्यान काही काळ सुट्टी मिळाल्याने या तुकडीतील पाच जण गोव्याला पर्यटनासाठी गेले होते. गोव्याहून परतत असताना यापैकी तिघे जण आंबोली घाटातील धबधब्याजवळ उतरले.

Char Dham Yatra : केदारनाथ, बद्रीनाथ मार्गांवर पुन्हा निसर्ग कोपला… थरकाप उडवण्याऱ्या घटनेचा VIDEO व्हायरल

यावेळी मितीलेश पॅकेरा हे दरीच्या दिशेने जात असताना त्यांचा तोल गेल्याने ते जवळपास ३०० फूट खोल दरी कोसळले. त्यांच्या सहकाऱ्यांनी याची माहिती लगेच आंबोली पोलिसांना दिली. काही वेळातच आंबोली पोलीस रेस्क्यू टीमसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी मितीलेश यांचा मृतदेह दरीतून बाहेर काढला.

धक्कादायक! एकाच कुटुंबातील सहा जणांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या… घटनेचा Video व्हायरल

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून ते मितीलेश यांच्या सहकाऱ्यांची चौकशी करत आहेत. तसेच मितीलेश यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. आज शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल.

महसूल विभागाची पुन्हा एकदा धडक कारवाई; जेसीबी, ट्रॅक्टरसह २६ लाखांचे साहित्य जप्त

- Advertisment -

ताज्या बातम्या