Sunday, June 30, 2024
Homeक्राईमNashik Crime News : घरगुती गॅसचा काळाबाजार; पोलिसांची म्हसरुळ, सातपूरला कारवाई

Nashik Crime News : घरगुती गॅसचा काळाबाजार; पोलिसांची म्हसरुळ, सातपूरला कारवाई

संशयितांत अल्पवयीनाचाही समावेश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

वाहनांमध्ये घरगुती वापराचा गॅस बेकायदेशीर पद्धतीने भरणाऱ्या संशयितांविरोधात शहर पोलिसांनी (City Police) कारवाई केली आहे. त्यानुसार म्हसरुळ व सातपूर पोलिस ठाण्यांत (Mhasrul and Satpur Police Station) संशयितांविरोधात जीवनावश्यक वस्तु कायद्यानुसार दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हे देखील वाचा : Nashik Crime News : स्वयंघोषित भाईचे पंटर जेरबंद

याबाबत अधिक माहिती अशी की, गुन्हे शाखा युनिट एकचे (Crime Branch Unit one) अंमलदार मुक्तार शेख यांच्या फिर्यादीनुसार, पेठरोडवरील अश्वमेध नगर परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये संशयित धनराज गणेशकर, विशाल भुसारे (रा. मखमलाबाद) यांच्यासह एक अल्पवयीन मुलगा एमएच १५ बीडब्ल्यू ५६५५ क्रमांकाच्या ओम्नी व्हॅनमध्ये घरगुती एलपीजी गॅस टाकीतून गॅस रिफिलिंगल करताना आढळले.

हे देखील वाचा : Nashik Niphad News : सोनेवाडीत विवाहितेची आत्महत्या

बुधवारी (दि.२६) दुपारी साडेतीनच्या सुमारास संशयितांनी (Suspected) भारत गॅस कंपनीच्या भरलेल्या सिलींडरमधून इलेक्ट्रीक मोटार, नोझल पाईपचा वापर करून संशयित विशाल भुसारेच्या वाहनात गॅस भरणा केला. त्यामुळे पोलिसांनी तिघांविरोधात म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी (Police) संशयितांकडून १ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात गॅस सिलींडर, व्हॅन, वजन काटा, ईलेक्ट्रीक मोटार व नोझल पाईपचा समावेश आहे.

हे देखील वाचा : Nashik Accident News : स्कूल बसच्या धडकेत युवकाचा मृत्यू

तर गुन्हे शाखा युनिट दोनच्या (Crime Branch Unit Two) पथकाने बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास भंदुरे मळ्याजवळ निलेश शेवरे यांच्या गोठ्याजवळ कारवाई केली. अंमलदार तेजस मते यांच्या फिर्यादीनुसार, संशयित शेखर विसपुते (रा. अशोक नगर) यांनी घरगुती वापरच्या गॅस सिलींडरमधून विनापरवानगी, बेकायदेशीररीत्या वाहनात गॅस भरणा करत असल्याचे आढळून आले. वाहन चालकांकडून संशयित पैसे घेत गॅस भरणा करीत हाेता. त्यामुळे पोलिसांनी विसपुते कडून २३ भरलेले व रिकामे गॅस सिलींडर, १५ हजार रुपयांची इलेक्ट्रीक मोटार, ५ हजार रुपयांचा वजनकाटा, रोकड असा एकूण ७४ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या