नाशिक | Nashik
शहरातील सिडको परिसरामधील (Cidco Area) त्रिमुर्ती चौकात ( Trimurti Chowk) स्कुल बसच्या धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार (Ambad Police Station) दाखल करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : विधानपरिषदेच्या मतदारसंघांसाठी सकाळपासून मतदान सुरु; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मयुर दत्ता गुंजाळ(वय १८) असे मृत्यू झालेल्या युवकाचे (Youth) नाव असून तो आपल्या इलेक्ट्रिकल दुचाकीवरून त्रिमुर्ती चौकाकडुन सिटीसेंटर मॉलकडे जात असतांना गोलीवडा जवळ एका स्कूल बसने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत मयूरला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू (Death) झाला.
हे देखील वाचा : नाशिक शिक्षक मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत ‘इतके’ टक्के मतदान
दरम्यान, सदर अपघाताची माहिती तात्काळ अंबड पोलीसांना (Police) कळविण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अपघातस्थळाची पाहणी केली. यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा