दिल्ली | Delhi
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी, “काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून घोडेबाजार सुरू असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. आता राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट काही आमदारांसह दिल्लीत दाखल झाल्याने राजस्थानमध्ये मध्यप्रदेशसारखा राजकीय भूकंंप होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
काल उपमुख्यमंत्री सचिन पायलट व काही आमदार दिल्लीला आले आहेत. हरियाणातील गुरूग्राम रिसॉर्टवर सध्या हे सर्व आमदार वास्तव्यास आहेत. या हाॅटेल बाहेरील पोलिस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली असल्याची माहिती एका वृत्त संस्थेने दिली आहे.
२०१८ मध्ये राजस्थान मध्ये काँग्रेस सरकार सत्तेत आले होते. तेव्हा पासून मुख्यमंत्री अशोक गेहलोत व उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या मध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू होती. अखेर पक्षाने अशोक गेहलोत यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातली होती.
तीन महिन्यांपूर्वी मध्यप्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपत प्रवेश करून काॅग्रेसचे कमलनाथ सरकार पाडण्याची घटना ताजी असताना, राजस्थानातही अगदी अशीच परिस्थिती उद्भवली आहे.