Saturday, July 25, 2026
HomeराजकीयDevendra Fadnavis : "त्यांनी भाजप नियमाने..."; बडगुजरांच्या प्रवेशानंतर CM फडणवीस स्पष्टच बोलले,...

Devendra Fadnavis : “त्यांनी भाजप नियमाने…”; बडगुजरांच्या प्रवेशानंतर CM फडणवीस स्पष्टच बोलले, नेमकं काय म्हणाले?

पुणे | Pune 

ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी काल (मंगळवारी) भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बडगुजर यांचा पक्षप्रवेश झाला. मात्र, बडगुजरांचा भाजपमधील हा पक्षप्रवेश राज्यभर चर्चेचा विषय ठरला. कारण १९९३ च्या मुंबई स्फोटातील आरोपी सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबतचे सुधाकर बडगुजर यांचे कनेक्शन भाजपने समोर आणले होते.

- Advertisement -

यावरून भाजपचे मंत्री नितेश राणेंनी विधानसभा डोक्यावर घेतली होती. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत कल्पनाच नव्हती. मात्र, चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऐनवेळी सुधाकर बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला हजेरी लावली. त्यामुळे काल दिवसभर सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्याचे दिसून आले. त्यानंतर आता या सर्व घडामोडींवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, “सुधाकर बडगुजर यांच्यावर टीका करण्यात आली होती, ही गोष्ट खरी आहे. त्यांचा एक व्हिडीओ देखील आमच्या नितेश राणेंनी रिलीज केला होता. पण त्यानंतर त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला, त्याची पूर्ण चौकशी झाल्यानंतर त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. हे सगळं बडगुजर त्या पक्षात (ठाकरेंच्या शिवसेनेत) असताना झालेले आहे. आमच्याकडे आल्यावर तसं घडलेलं नाही, हे मी पुन्हा एकदा सांगतो”, असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) आधीच हे सगळं घडलेलं असून, त्या निवडणुकीत आमच्याविरूद्धचे ते उमेदवार होते. तेव्हा ते शिवसेनेचे उमेदवार होते. आता निवडणुकीनंतर त्यांनी पक्षात येण्याची इच्छा दर्शवली. निवडणुकीत त्यांनी भरपूर मते घेतलेली आहेत. आपल्या पक्षात कोणी येत असेल तर आपण निश्चितपणे त्याचं स्वागत करतो. फक्त अपेक्षा हीच असते की त्यांचा जुना इतिहास काय असेल, वागण्याची पद्धत काय असेल, ती बाजूला ठेवून आता त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या निती नियमांनी वागलं पाहिजे,’ असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.

तसेच “काल सुधाकर बडगजुर यांचा पक्षप्रवेश ठरला तेव्हा त्याची जबाबदारी आम्ही गिरीश महाजनांवर (Girish Mahajan) दिली होती. प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना त्याची कल्पना नव्हती. नाशिकमध्ये बावनकुळेंनीच तिथल्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना समजावलं होतं की बडगुजरांना आपल्याला प्रवेश का द्यायचा आहे. त्यामुळे बावनकुळेंचा प्रवेशाला विरोध नव्हता. ज्यावेळी महाजनांनी त्यांना सांगितलं की आज पक्षप्रवेश ठरला आहे, त्यावेळी बावनकुळे स्वत:हजर होते. त्यामुळे फार तर संवादाचा अभाव असेल. मात्र, विरोध कोणाचाच नव्हता. स्थानिक स्तरावर थोडा विरोध झाला. पण त्यांनाही आम्ही समजावलं. पक्ष वाढवायचा असल्याने आपण त्यांचा प्रवेश करुन घेत असल्याचे आपण नाशिकच्या (Nashik) पदाधिकाऱ्यांना समजावलं होतं, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

राजीनामा

मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा; CJP आंदोलनाला...

0
मुंबई | Mumbai जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी...