Saturday, February 14, 2026
HomeनाशिकNeelam Gorhe : "डोंगर फस्त करणार्‍यांनी शिंदेंबद्दल बोलू नये"; विधानपरिषदेच्या उपसभापती ...

Neelam Gorhe : “डोंगर फस्त करणार्‍यांनी शिंदेंबद्दल बोलू नये”; विधानपरिषदेच्या उपसभापती गोऱ्हेंचा मंत्री नाईकांवर टीकेचा बाण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक दौर्‍यावर (Nashik Tour) आलेल्या विधानपरिषदेच्या उपसभापती व शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील राजकीय घडामोडींवर थेट भूमिका मांडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाला ठाम पाठिंबा दिला. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक असून नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांसाठी अर्थसंकल्पात ठोस निर्णयाची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्याचे निकष आणि केंद्राची भूमिका लक्षात घेऊन अधिवेशनात चर्चा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

शिंदे यांना ‘जनादेशाची ताकद’, नाईकांवर टीका

YouTube video player

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करणार्‍या गणेश नाईक (Mininster Ganesh Naik) यांचे नाव न घेता गोऱ्हे यांनी खरपूस समाचार घेतला. स्वतःच्या कर्तृत्वावर ६० आमदार निवडून आणण्याची ताकद शिंदे यांनी दाखवून दिली आहे. दोन आमदार निवडून आणणे आणि डोंगर फस्त करणार्‍यांनी शिंदेंबद्दल बोलू नये, असा टोला त्यांनी लगावला. या विधानातून सत्ताधारी आघाडीतील एकजूट आणि नेतृत्वावरील विश्वास स्पष्ट दिसला.

हे देखील वाचा : Chhagan Bhujbal : “सुनेत्रा ताई नवीन कॅप्टन आता त्यांना …”; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मंत्री भुजबळ स्पष्टच बोलले, नेमकं काय म्हणाले?

लिंग गुणोत्तरावर सरकारचे लक्ष; शहरात चिंताजनक घसरण

केंद्र व राज्य सरकारचे (State and Central Government) प्रयत्न, सामाजिक जागृती आणि न्यायालयाची दखल यामुळे एकूण लिंग गुणोत्तरात सुधारणा होत असल्याचे त्यांनी नमूद केले; मात्र अजून मोठ्या प्रमाणात कामाची गरज असल्याचेही स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी सक्षम अधिकारी

जिल्ह्यातील अलीकडील आढाव्यानुसार ग्रामीण मालेगाव भागात ९८९, इतर ग्रामीण भागात ९४८ तर शहरात ८९४ असे गुणोत्तर नोंदले गेले. शहरात बेकायदेशीर चाचण्यांमुळे प्रमाण घटण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी प्रशासनाने कडक कारवाई व ‘सेफ्टी ऑडिट’वर भर द्यावा, असे सांगितले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे कर्तव्य दक्ष अधिकारी असून, त्यांनी यासंदर्भात काम सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली.

हे देखील वाचा : Narhari Zirwal : “मंत्री झिरवाळ नॉट रिचेबल नव्हे तर जवळच्या…”; आदिवासी संमेलनालाही होते गैरहजर, नेमके आहेत कुठे?

महिलांची सुरक्षितता, मानव तस्करीवर समन्वय

नाशिक व संभाजीनगर भागात मुलींच्या अनैतिक व्यापाराचे ‘हॉटस्पॉट’ निर्माण होत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. रेल्वे, शहर व ग्रामीण पोलिसांनी (Rural Police) समन्वयातून ट्रॅकिंग वाढवण्याचे निर्देश देणार असल्याचे सांगितले. ‘मुस्कान’ उपक्रमाद्वारे मुलींना शोधून काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. कुटुंबीय ताणतणाव, जबरदस्तीचे संबंध व धर्मांतरासारख्या प्रकारांबाबत कठोर भूमिका घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कर्जमाफी, महिलांची सुरक्षितता आणि लिंग गुणोत्तर यांसारख्या मुद्द्यांवर सरकार संवेदनशील असून निर्णयक्षम नेतृत्व देत असल्याचा संदेश गोरे यांनी दिला. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना शिंदे-फडणवीस नेतृत्वावरचा विश्वास त्यांनी ठामपणे मांडला. आगामी अधिवेशन आणि अर्थसंकल्पात या मुद्द्यांवर ठोस निर्णयाची अपेक्षा राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

Chhagan Bhujbal : “सुनेत्रा ताई नवीन कॅप्टन आता त्यांना …”; राष्ट्रवादीच्या...

0
नाशिक | Nashik राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दिग्गज नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय वारशावरून आणि दोन राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राज्यातील राजकारण कमालीचे तापले...