Monday, July 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजEknath Shinde : "सगळं फुलप्रूफ, आम्ही तोडायला नाही तर…"; सचिन अहिर शिवसेनेत...

Eknath Shinde : “सगळं फुलप्रूफ, आम्ही तोडायला नाही तर…”; सचिन अहिर शिवसेनेत येताच DCM शिंदे स्पष्टच बोलले

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असून, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला (Shivsena) एकामागून एक मोठे धक्के बसत आहेत. गेल्या आठवड्यात सहा खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर, आता विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

- Advertisement -

दरम्यान या पक्षप्रवेशानंतर अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election) उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर उपमुख्यमंत्री शिंदे आणि सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.

यावेळी ते म्हणाले की, “आम्ही कोणत्याही प्रकारचं तोडकाम करत नाही, तर जोडकाम करतो. आम्ही इथे तोडायला नाही, तर जोडायला आलो आहोत. काही लोक तुडवायला आले, पण आम्ही शिवसेना (Shivsena) वाढवायला आलो आहोत. आमचा अजेंडा खुर्ची मिळवणे हा नसून, ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवलं त्यांचे प्रश्न सोडवणं हाच आमचा अजेंडा आहे”, असे शिंदेंनी म्हटले.

आपला तो बाब्या, दुसऱ्याचं कार्ट

काही लोक पक्षात असेपर्यंत चांगले असतात, पण सोडून गेल्यावर त्यांच्यावर टीका केली जाते. ‘आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट’ अशी काहींची वृत्ती सुरू आहे. आताही काही लोक आमच्यावर टीका करत आहेत, पण मी त्यावर बोलणार नाही. आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन महाराष्ट्राच्या (Maharashtra) प्रगतीसाठी पुढे जात आहोत,” असा टोला शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.

लोकांचा विश्वास वाढतोय

शिवसेना ही शब्दाला किंमत देणारी संघटना आहे, त्यामुळेच लोक स्वतःहून पक्षात (Party) येत आहेत. खासदार म्हणजे २० ते २५ लाख लोकांचे प्रतिनिधित्व करणारा नेता असतो, अशा ६ खासदारांनी सोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेला आणि मतदारसंघाला न्याय मिळावा, याच भावनेतून हे सर्व लोक सोबत येत असल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले. तसेच गोकुळ गिते यांनीही निवडून आल्यावर सहयोगी सदस्य म्हणून काम सुरू केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अन् एकनाथ शिंदे चुकून म्हणाले ‘सचिन तेंडुलकर’

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांचा उल्लेख चुकून ‘आमदार सचिन तेंडुलकर’ असा केला. त्यामुळे पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. स्वतः सचिन अहिर यांच्यासह उपस्थित असलेल्या सर्वच नेत्यांना हसू आवरले नाही. यावर तातडीने सावरून घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी “मघाशी मी चुकून सचिन तेंडुलकर असं नाव घेतलं. परंतु, सचिन अहिर देखील उत्तम अष्टपैलू खेळाडू आहेत. आज त्यांनी राजकारणात गुगली टाकली आहे. गेल्या आठवड्यात सहा खासदारांनी षटकार मारला होता आणि आज सचिन अहिर यांनी षटकार मारला आहे. राजकारणात अजूनही चौकार-षटकार सुरूच आहेत, असे त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 3200 रुपयांपर्यंत भाव मिळाला. डाळिंबाला प्रतिकिलोला 255 रुपये...