Friday, February 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNarhari Zirwal : मंत्रालयातील लाचप्रकरणी मंत्री झिरवाळ अ‍ॅक्शन मोडवर; घेतला 'हा' मोठा...

Narhari Zirwal : मंत्रालयातील लाचप्रकरणी मंत्री झिरवाळ अ‍ॅक्शन मोडवर; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | Mumbai

अन्न व औषध प्रशासन विभागाचे विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ (Minister Narhari Zirwal) यांच्या खाजगी सचिवपदावर कार्यरत असलेले डॉ. रामदास गाडे (Ramdas Gade) यांना पदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे.

- Advertisement -

डॉ. गाडे हे सहायक आयुक्त (पशुसंवर्धन), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई येथे कार्यरत असून ते प्रतिनियुक्तीवर खाजगी सचिव या पदावर काम पाहत होते. सोमवार (दि १६ फेब्रुवारी) पासून त्यांची सेवा त्यांच्या मूळ विभागात कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई (Mumbai) येथे प्रत्यावर्तित करण्यात आली आहे.

YouTube video player

दरम्यान, या संदर्भातील आवश्यक आदेश तातडीने निर्गमित करावेत, असे निर्देश मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय (Mantralaya) यांना पत्राद्वारे दिले आहेत.

फाईलवर पेनाने एक लाईन मारणे ५० हजार तर दोन लाईन म्हणजे ०१ लाख रुपये

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात लाच घेण्यासाठी कथित ‘सिक्रेट कोडवर्ड’ वापरला जात असल्याचा आरोप समोर आला आहे. स्टिंग ऑपरेशनमध्ये फाईलवर पेनाने एक लाईन मारणे म्हणजे ५० हजार रुपये, तर दोन लाईन म्हणजे ०१ लाख रुपये अशी खूण वापरली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात डॉ. गाडे यांचे नाव समोर आले आहे. मेडिकल दुकानदार निर्मल शर्मा यांनी केलेल्या स्टिंगनुसार, औषधांच्या फ्रीजमध्ये पाण्याच्या बाटल्या व ओआरएस ठेवल्यामुळे त्यांचा परवाना एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आला होता.

त्याविरोधात त्यांनी ०७ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात अपील दाखल केले. १३ फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली. या सुनावणीसाठी मंत्रालयात गेलेल्या शर्मा यांना डॉ. गाडे यांच्या ऑफिसमध्ये बसवण्यात आले. त्यावेळी लिपिक राजेंद्र ढेरंगे यांनी कथितरित्या ०१ लाख १० हजार रुपयांची मागणी केली. त्यातील ०१ लाख ‘वरच्या अधिकाऱ्यांसाठी’ आणि १० हजार स्वतःसाठी असल्याचा उल्लेख व्हिडिओमध्ये ऐकू येत असल्याचा दावा आहे. शर्मा यांनी रक्कम जास्त असल्याचे सांगितल्यानंतर ५० टक्के सवलत देण्याची ऑफर देण्यात आली. त्यांनी ०२ हजार रुपये ऑनलाईन व ५३ हजार रुपये रोख दिल्याचे सांगितले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Fraud Crime : बनावट ‘एम-परिवहन’ चे जाळे; नऊ लाखांची फसवणूक

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik 'इ-चालन थकित असल्याचा मेसेज आणि 'एम-परिवहन'च्या नावाशी साधर्म्य असलेली एपीके फाईलची (APK File) लिंक त्यावर क्लिक करताच क्रेडिट कार्डवरील तब्बल...