Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRaj Thackeray : 'बेस्ट' च्या निकालानंतर मनसेप्रमुख राज ठाकरेंनी घेतली...

Raj Thackeray : ‘बेस्ट’ च्या निकालानंतर मनसेप्रमुख राज ठाकरेंनी घेतली CM फडणवीसांची भेट; तब्बल ५० मिनिटं खलबतं, कारण काय?

मुंबई | Mumbai

‘बेस्ट’ पतपेढी निवडणुकीत (Best Election) ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज (गुरुवारी) सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आहे. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत (Mumbai) पावसामुळे झालेली पूरस्थिती, पाऊस आणि मिठी नदीसह विविध नागरी समस्यांवर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांनी फडणवीसांची भेट घेतल्याची चर्चा आहे. मात्र सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राजकीय नेत्यांच्या (Political Leader) भेटींमधील गुप्त चर्चा नेहमीच गुलदस्त्यात असतात. त्यामुळे या भेटीतून काही ठोस राजकीय निर्णय समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

YouTube video player

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे फडणवीस या पत्रकार परिषदेत राज ठाकरे भेटीचे कारण सांगण्याची शक्यता आहे. सार्वजनिकरित्या देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीत नागरी समस्यांवर चर्चा झाली असल्याचे बोलले जात असले तरी पडद्यामागे राजकीय विषयांवर महत्त्वाची चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, यापूर्वी देखील राज ठाकरेंनी शिवसेना आणि मनसे (Shivsena and Mns) युतीची चर्चा सुरु असताना १२ जून रोजी वांद्रे येथील ताज लँडस् हॉटेलमध्ये देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. या भेटीत या दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली होती. मात्र, त्यानंतर राज ठाकरे हे वरळीतील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर एकत्र दिसून आले होते. त्यानंतर शिवसेना आणि मनसे युतीच्या वाटाघाटींना वेग आला होता.

ताज्या बातम्या

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ च्या खर्चात १५ हजार कोटींची वाढ; आता...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai   कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District) शेतकऱ्यांच्या (Farmer) विरोधामुळे वादग्रस्त ठरलेल्या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी 'शक्तिपीठ' महामार्गाच्या आखणीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास...