Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजThackeray Brothers Alliance : मनसे-शिवसेना युतीची राज ठाकरेंकडून घोषणा; दोन्ही बंधू नेमकं...

Thackeray Brothers Alliance : मनसे-शिवसेना युतीची राज ठाकरेंकडून घोषणा; दोन्ही बंधू नेमकं काय म्हणाले?

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

गेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या ठाकरे बंधूंच्या (Thackeray Brothers) बहुचर्चित युतीची घोषणा मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील (Mumbai) ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन केली. त्याआधी दोन्ही बंधूंनी आपल्या कुटुंबीयांसह बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केले. त्यानंतर ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली.

- Advertisement -

यावेळी बोलतांना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढण्यानंतर मराठी ऐक्याचा मगंलकलश होता. आज पुन्हा एकदा मराठी ऐक्याचा मंगलकलश घेऊ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आलेले आहेत. तोच आनंदाचा क्षण महाराष्ट्रात आला आहे. मुंबईसह अनेक महापालिकेत विजयी भगवा फडकावल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राला ठाकरेच नेतृत्व देऊ शकतात, अन् महाराष्ट्र ठाकरेंच्याच पाठीशी असतील, असे त्यांनी म्हटले.

YouTube video player

हे देखील वाचा : Thackeray Brothers Alliance : भाऊबंदकीला स्वल्पविराम; ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, “महाराष्ट्राच्या मंगलकलशासाठी मोठा संघर्ष करावा लागला. आमचे विचार एक असून, काही लोक मुंबईचे लचके तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मराठी माणूस तुटला तर संपून जाईल. कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. मुंबई वरती आणि महाराष्ट्र वरती कोणी वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या कपटीकार असताना महाराष्ट्राला मुंबईपासून मूक किंवा मुंबईला महाराष्ट्रपासून मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो आहोत”, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Video : ठाकरे बंधूंकडून बाळासाहेबांना अभिवादन; राज आणि उद्धव ठाकरे कुटुंबीय स्मृतिस्थळावर उपस्थित

राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, “माझी एक मुलाखत झाली होती,त्यात मी म्हटलं होतं की, कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. तिथून एकत्र येण्याची सुरुवात झाली.कोण किती जागा लढवणार, आकडा काय हा आज तुम्हाला सांगणार नाही. महाराष्ट्रात सध्या लहान मुलं पळवण्याच्या टोळ्या फिरत आहे. त्यात दोन जास्त टोळ्या अॅड झाल्या आहेत. त्या राजकीय पक्षातील टोळ्या पळवतात. जे निवडणूक लढवत आहेत. त्या सर्व उमेदवारांना उमेदवारी दिली जाईल. कधी भरायची ती कळवली जाईल. महाराष्ट्र ज्याची प्रतिक्षा करत होता त्या शिवसेना आणि मनसेची युती झाली असल्याचे जाहीर करतो”,असे त्यांनी म्हटले. तसेच मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार, असेही यावेळी राज ठाकरेंनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

सुरेश

पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडींचं निधन; वयाच्या ८२व्या वर्षी घेतला अखेरचा...

0
पुणे | Puneकाँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे आज (6 जानेवारी 2026) पुण्यातील वयाच्या ८२ व्या वर्षी दीर्घ आजाराने...