नवी दिल्ली | New Delhi
नेपाळ सरकारने (Nepal Government) एक्स, फेसबुक, इन्स्टाग्रामसह २६ सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्यामुळे GenZ तरूणाचा (Youth) उद्रेक झाला. या निर्णयाच्या निषेधार्थ नेपाळची राजधानी काठमांडूसह अनेक ठिकाणी या तरुणांनी हिंसक निदर्शने केली. या उद्रेकामुळे नेपाळचे सरकार कोसळले असून, राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी राजीनामा दिला आहे.
अशातच आता या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सूचक ट्विट केले आहे. यात “अशी परिस्थिती कुठल्याही देशात उद्भवू शकते, सावधान!” असे राऊत म्हणाले आहेत. तसेच त्यांनी आपल्या ट्विटमध्ये भाजप आणि नरेंद्र मोदी यांना देखील मेन्शन केले आहे. याशिवाय एका युवकाचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. राऊत यांच्या ट्विटमुळे भारताच्या राष्ट्रीय राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, नेपाळचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान केपी शर्मा ओली (KP Sharma Oli) यांनी राजीनामा (Resigns) दिल्यानंतर नेपाळमध्ये सत्तांतराची प्रक्रिया सुरू झाली आहे. आंदोलकांनी पंतप्रधान पदासाठी काठमांडूचे ३५ वर्षीय महापौर (Kathmandu Mayor) बालेन शाह (Balendra Shah) यांचे नाव सुचवले आहे. त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारावे आणि देशाची सूत्रे हाती घ्यावीत, अशी मागणी आंदोलक तरुणांनी केली आहे. त्यामुळे नेपाळचे नेतृत्व त्यांच्याकडे जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
नेमके बालेन शाह कोण आहेत?
बालेन शाह हे पेशाने इंजिनीअर असून, त्यांनी सुरुवातीला अभियांत्रिकी क्षेत्रात काम केले आहे. त्यानंतर ते रॅपर झाले. यामुळे ते तरुणाईत लोकप्रिय झाले. बालेन शाह यांची एकूण संपत्ती नेपाळी रुपयांमध्ये ५ ते ६ कोटी असून, मासिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यांचा जन्म २७ एप्रिल १९९० रोजी काठमांडू येथे झाला. वडील आयुर्वेदिक चिकित्सक तर आई गृहिणी आहेत. कर्नाटकातील विश्वेशरैय्या टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटमधून (Visvesvaraya Technological University VTU) बालेन शाह यांनी स्ट्रक्चरर इंजिनिअरिंग या विषयात एम.टेकची पदवी घेतली आहे.




