Wednesday, March 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut : विरोधी पक्षनेता नसणे हे  सरकारसाठी लाजिरवाणे - राऊतांचे टीकास्त्र

Sanjay Raut : विरोधी पक्षनेता नसणे हे  सरकारसाठी लाजिरवाणे – राऊतांचे टीकास्त्र

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

लोकशाहीत विरोधी पक्षनेत्याला महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, सध्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसणे ही बाब  राज्य आणि केंद्र सरकारसाठी लाजिरवाणी आहे. विरोधी पक्षाशिवाय तुम्ही दोन्ही सभागृह चालवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता नाही. या मुद्द्यावरून राऊत यांनी सरकारला चांगलेच सुनावले.

- Advertisement -

केंद्रात भाजपचे सरकार (BJP Government) आल्यापासून अनेक राज्यांत विरोधी पक्षनेता दिला गेला नाही. आता लोकसभेत राहुल गांधी यांना बाहेर काढण्याचे कारस्थान सुरू आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) विरोधी पक्षनेता होऊ नये म्हणून चक्क कायदे बदलले जात आहेत. लोकशाही मार्गाने मुख्यमंत्री व्हायचे आणि त्याच लोकशाहीतील महत्त्वाचे पद नाकारायचे, हे कृत्य लोकशाहीला काळिमा फासणारे आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते  भास्कर जाधव यांचे नाव दिले आहे. आता बरेच महिने झाले आहेत. पण ते नकोत, हे ठरवणारे तुम्ही कोण? विधान परिषदेतही विरोधी पक्षाला ते पद मिळू नये , यासाठी कारस्थाने केली जात आहेत. महाराष्ट्राच्या ज्या मातीतून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्माण केले, त्या राज्यात लोकशाहीची अशी गळचेपी आणि हत्या होत केली जात आहे. यामागे विधानसभा अध्यक्ष आहे, असा आरोप राऊत यांनी केला.

तसेच जी व्यक्ती विधानसभेच्या अध्यक्षपदी बसून पक्षांतराच्या बाबतीत खोटा आणि भंपक निर्णय देते, त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? अशा विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणला पाहिजे, अशी संतप्त भावनाही संजय राऊत यांनी व्यक्त केली. विधिमंडळात  विरोधी पक्षनेता असेल तर तो जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडू शकतो. अनेक विषयांवर प्रश्न विचारून सरकारची कोंडी करू शकतो. पण याच भितीपोटी जर सरकार विरोधी पक्षनेताच नेमत नसेल तर सरकार डरपोक आहे. तुम्ही लोकशाही मार्गाने निवडून येता, मुख्यमंत्री बनता. मात्र त्याच लोकशाहीत विरोधी पक्षनेत्याला जे स्थान आहे, ते टाळून इतर सर्व उद्योग  करायचे. लोकशाहीला कलंक लावण्याचा हा प्रकार असल्याचेही राऊत म्हणाले.

ताज्या बातम्या

Ashok Kharat Case : मंत्रालयाजवळील पंचतारांकित हॉटेलमध्ये खोल्या कायमच्या बुक, ‘वर्षा’वर...

0
सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे तर खरातच्या प्रेमात आकंठ बुडाल्याची चर्चा त्यावेळी होती. सत्ता टिकवण्याची कसरत करताना खरातची...