नाशिक | प्रतिनिधी | Nashik
विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) एका जागेसाठी गुरुवारी (दि. १८) मतदान (Voting) होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात नऊ मतदान केंद्रे (Voting Centre) राहणार आहेत. आज (दि. १६) दुपारी चार पासून गुरुवार (दि.१८) रोजी सायंकाळपर्यंत मद्यविक्री बंद राहणार आहेत.
हे देखील वाचा : Nashik NCP News : विधानपरिषद निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र रद्द, पदावर गंडांतर
जिल्ह्यात आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू असून अद्याप एकही तक्रार आलेली नाही, असे निवडणूक उपजिल्हाधिकारी मधुमती सरदेसाई यांनी सांगितले. मतदान १८ जूनला सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत होईल. मतमोजणी २२ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारत होईल. जिल्ह्यात ६१९ मतदार आहेत. निवडणुकीसाठी मरतपत्रिकेचा वापर करण्यात येणार असून त्यामध्ये मतदारांनी पंसती क्रमानुसार मतदान करावयाचे आहे.
हे देखील वाचा : Nashik Vidhan Parisahd Election : शहराध्यक्षांच्या ड्रायव्हिंगचा उत्साह पडला महागात; भाजप नगरसेवकांची बस थेट भिंतीवर आदळली
सार्वजनिक मालमत्ता विद्रुपित केली असेल त्यांनी अशी पोस्टर्स, भित्तिपत्रके, घोषणा, झेंडे, कापडी फलक व चिन्ह इ. काढून टाकण्याची तातडीने व्यवस्था करावी. या निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. मतदान प्रक्रियेकरिता आवश्यक जम्बो बॅलेट बॉक्स व्यवस्था करण्यात आलेली आहे, असेही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Aayush Prasad) यांनी सांगितले.
जिल्ह्यातील मतदान केंद्र
१. नाशिक तहसील कार्यालय : नाशिक महानगर पालिका सदस्य (१२२), भगूर नगर परिषद सदस्य (२३) देवळाली छावणी परिषद (१).
२. दिंडोरी तहसील कार्यालय : दिंडोरी नगर पंचायत सदस्य (१९), पेठ नगर पंचायत सदस्य (१८).
३. इगतपुरी तहसील कार्यालय : इगतपुरी नगर परिषद सदस्य (२४), त्र्यंबकेश्वर नगर परिषद सदस्य (२३).
४. निफाड तहसील कार्यालय : निफाड नगर पंचायत सदस्य (१९), पिंपळगांव बसवंत नगर परिषद (२९), ओझर नगर परिषद (३१), सिन्नर नगर परिषद सदस्य (३४).
५. येवला तहसीलदार कार्यालय : येवला नगर परिषद सदस्य (३०), नांदगाव नगर परिषद सदस्य (२३), मनमाड नगर परिषद सदस्य (३५).
६. मालेगाव तहसीलदार कक्ष : मालेगाव महानगर पालिका सदस्य (८४).
७. चांदवड तहसीलदार कक्ष : चांदवड नगर परिषद पंचायत सदस्य (२३), देवळा नगर पंचायत सदस्य (१८).
८. कळवण तहसीलदार कक्ष : कळवण नगर पंचायत सदस्य (१९), सुरगाणा नगर पंचायत सदस्य (१९),
९. बागलाण तहसीलदार कक्ष : बागलाण सटाणा नगर परिषद सदस्य (२८)




