Friday, September 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMamata Banerjee : ममता बॅनर्जी यांना दिल्लीत धक्का; राज्यसभेच्या दोन खासदारांनी दिला...

Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांना दिल्लीत धक्का; राज्यसभेच्या दोन खासदारांनी दिला राजीनामा

नवी दिल्ली | New Delhi

पश्चिम बंगालनंतर आता तृणमूल काँग्रेस (TMC) प्रमुख ममता बॅनर्जी यांना दिल्लीतही (Delhi) मोठा राजकीय धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसच्या दोन राज्यसभा खासदारांनी (Rajyasabha MP) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यात खासदार सुखेंदू शेखर रॉय आणि कोएल मल्लिक यांचा समावेश आहे.

- Advertisement -

खासदार सुखेंदू शेखर रॉय (Sukhendu Shekhar Roy) यांनी केवळ राज्यसभेच्या सदस्यत्वाचाच नव्हे तर पक्षाचाही राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये व्यापक भ्रष्टाचार असल्याचा गंभीर आरोप केला. “भ्रष्टाचाराविरोधात उघडपणे बोलल्यामुळे मला पक्षात एकटे पाडण्यात आले,” असा दावा रॉय यांनी केला आहे.

सुखेंदू शेखर रॉय २०११ मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले. त्यानंतर ते ममता बॅनर्जी यांच्या जवळचे झाले आणि पक्षाच्या चढ-उतारात ते पक्षाच्या पाठीशी उभे राहिले. मात्र आता त्यांनी राजीनामा दिला असून, भाजपची (BJP) प्रशंसा केली आहे. त्यामुळे ते लवकरच भाजपमध्ये सामील होऊ शकतात अशी, शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.



ताज्या बातम्या

मराठा समाज दुखावला, एकेरी भाषेत बोलाल तर…; शिंदे गटाच्या नेत्याचा मनोज...

0
धाराशिव । Dharashiv मराठा आरक्षणाच्या तीव्र लढ्याने संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण...