Sunday, November 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजविशेष : शतकपूर्तीच्या दिशेने प्रेरणादायी प्रवास

विशेष : शतकपूर्तीच्या दिशेने प्रेरणादायी प्रवास

पंतप्रधान नरेंद्र मोदी

श्री. लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) जी, ८ नोव्हेंबर रोजी आयुष्याच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. योगायोगाने त्यांचा वाढदिवस (Birthday) दिवाळीच्या दिवशी आला आहे.

- Advertisement -

आपण जनसंघाच्या स्थापनाचे ७५ वर्षे पूर्ण करत आहोत, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची १२५ वी जयंती साजरी करत आहोत आणि नुकतीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची १०० वर्ष साजरी केली आहेत अशावेळेी त्यांचा वाढदिवस आला आहे, खरे तर आधुनिक भारताच्या असंख्य वेगवेगळ्या अध्यायांना ज्यांच्या आयुष्याने स्पर्श केला आहे, असे फारच कमी लोक आहेत. अडवाणींजींचा जन्म ८ नोव्हेंबर १९२७ रोजी, देव दीपावलीच्या दिवशी झाला होता. १९४७ मध्ये युवा अवस्थेत असतानाच त्यांनी सिंधमधील आपले परिचयाचे जग मागे सोडून जावे लागण्याच्या वेदना सोसल्या. मात्र आपल्या जगण्यात कोणतीही कडू भावना न बाळगता त्यांनी पुन्हा नव्याने अगदी शून्यातून आपले आयुष्य उभारले.

भाजपचे (BJP) अध्यक्ष म्हणून त्यांच्या कार्यकाळात १९८९ मध्ये काँग्रेसचे संख्याबळ ४०० वरून थेट २०० च्या खाली घसरले होते. इतकेच नाही तर १९९६ मध्ये भाजप पहिल्यांदाच सर्वात मोठा पक्ष बनला होता. अडवाणी यांनी कार्यकर्त्यांच्या अनेक पिढ्या घडवल्या आणि राष्ट्र प्रथम या सुस्पष्ट त्याल्यावर आधरलेला पाया पक्षाला घालून दिला. आपल्या आणखी दोन गुणांमुळे अडवाणीजी एक नेते म्हणून नेहमीच वेगळे ठरले आहेत. त्यातला पहिला गुण म्हणजे त्यांची वैचारिक स्पष्टता आणि कुशाग्र बुद्धिमत्ता. त्यांच्या भाषणांमधून आणि लिखाणातून या गुणांची प्रचिती येते. त्यांनी लिहिलेले जनसंघ आणि भाजपचे ठराव वाचवेत असे आहेत. दुसरीकडे त्यांच्या मुलाखती नेमक आणि बारकाईने विश्लेषण करणाऱ्या असायच्या. त्याचवेळची भारताच्या राजकारणातील एका मोठ्या वर्गाने अनेक वर्षे मांडणी केलेल्या भ्रामक धर्मनिरपेक्षतेला त्यांनी ज्या रीतीने उघडे पाडले तोच त्यांचा दुसरा गुण.

सुरुवातीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून अडवाणींजींनी राजस्थानच्या विविध भागांत काम केले. तिथून ते राजधानी दिल्लीत गेले. तिथेच त्यांची अटलजींसोबत अत्यंत घनिष्टतेने काम करायला सुरुवात झाली. त्यांनी एकत्र मिळून भारतीय राजकारणाची दिशाच बदलून टाकली. अडवाणीजी दिल्लीत आले, त्यावेळेी दिल्ली फाळणीच्या भयानक वास्तवाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होती. अशावेळी त्यांनी जनसंघाला सक्षम करण्याच्या कामात पूर्णपणे झोकून दिले. १९६७ मध्ये अडवाणींजी दिल्ली महानगर परिषदेचे अध्यक्ष झाले. तिथे त्यांनी दिवंगत विजयकुमार मल्होत्रांजींच्यासोबत काम केले, त्यानंतर राष्ट्रीय मुख्य कार्यकारी नगरसेवक झाले. अडवाणींजींच्या संसदीय कारकीर्दीला सुरुवात झाली ती १९७० मध्ये. त्यांनी संसदेत मांडलेल्या मुद्यांची संपूर्ण राजकीय विशाने कायमच प्रशंसा केली. एक खासदार म्हणून आणि नंतर दोन्ही सभाग्रहांमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी आपली छाप पाडली. सत्ताधारी पक्षाचे सदस्य म्हणूनही त्यांनी अशीच छाप सोडली. महत्त्वाचे म्हणजे संसदीय कामाच्या जबाबदाऱ्या असून त्यांनी सातत्याने भारतभर प्रवास केला आणि लोकांना भेटत राहणे सुरू ठेवले.

मला १९९१ ची लोकसभा निवडणूक (Loksabha Election) अगदी ठळकपणे आठवते. अडवाणींजी लोकसभांची निवडणूक दोन जागांवरून लढवतील, असे ठरले होते. त्यापैकी एक जागा गांधीनगरची होती. गुजरातीची त्यांचे जुने ऋणानुबंध होतेच. फाळणीनंतर त्यांचे वडील कच्छमध्ये स्थायिक झाले होते. अडवाणींजींनी गुजरातचे राज्यसभा खासदार म्हणूनही काम केले होते. त्यामुळे हे एक प्रकारे त्यांचे आपल्या घरी परतण्यासारखेच होते. त्यावेळी मी भाजपच्या संघटनेत कार्यरत होतो, आणि त्यामुळे मला त्यांच्या उमेदवारीचा अर्ज तयार करण्याच्या प्रक्रियेत मदत करण्याचा आणि संपूर्ण प्रचारात त्यांना सहकार्य करण्याचा बहुमान लाभला होता. गांधीनगरच्या जनतेने वारंवार संसदेत पाठवले, गांधीनगरचा एक मतदार म्हणून मलाही अनेक प्रसंगी अडवाणीजींना मतदान करण्याचा बहुमान लाभला आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघात सातत्याने ठेवलेले लक्ष आणि घेतलेली काळजी यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे.

आणिबाणी हा अडवाणींजींच्या आयुष्याला कलाटणी देणारा कालखंड होता. लोकशाही रक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये ते आघाडीवर होते. ड्राज प्रिझनर्स स्क्रॅप बुक पापुस्तकातून त्यांनी त्यांच्या त्या दिवसातील अनुभवांना जगासमोर आणले. याच पुस्तकातील ‘हू आर टेल ऑफ टू इमर्जन्सीज’ नावाच्या एका भागात जून १९७५ पासून भारतात सुरू झालेल्या घडामोडी आणि १९३३ मधील नाझी जर्मन कालखंडातील घडामोडी यातील कमालीचे साम्य देखील माझ्याकडे आहेत. नंतर, गुजरातमध्ये भाजपने चिमणभाई पटेल सरकारच्या पाठीिबा काढून घेतले. आपल्या विचारसरणीचा आणि राम मंदिराचा प्रश्न येतो, तेव्हा कोणतीही तडजोड केली जाणार नाही, हा स्पष्ट संदेश यातून दिला गेला. काहीही झाले तरी राम मंदिर बांधले जाईल, अशी शपथ आमच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतली आणि अखेर काही वर्षांनी, भारताच्या जनतेच्या आशीर्वादाने, अयोध्येत प्रभू श्री राम यांचे एक भव्य मंदिर प्रत्यक्षात आले.

अडवाणीजींविषयी सांगायचे झाले तर त्यांच्या अनेक असामान्य गोष्टी आहेत. याचे उदाहरण म्हणजे त्यांचा साधेपणा. नवनिर्माण चळवळीनंतर अडवाणीजी जुनागडला आले होते आणि एक महिनाभर एखाद्या सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे तिथे राहून त्यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी केली. या निवडणुकीत काँग्रेसला जनतेने नकारले, सार्वजनिक जीवनातील प्रामाणिकपणा आणि नैतिकता काय असते, हे त्यांनी नेहमीच दाखवून दिले. ते एक उत्तम वाचतक आहेत, ज्यांनी त्यांच्यासोबत काळ व्यतीत केला आहे त्यांना हे चांगлеच माहित आहे की ते वृत्तपत्रे किती बारकाईने वाचतात. ते चित्रपट आणि नाटकांचे मोठे चाहते आहेत, तसेच एक उत्साही चित्रपट समीक्षक देखील राहिले आहेत. इतिहासाची त्यांची समज आणि त्याचे जतन करण्याची गरज त्यांच्या द्रमाय केटी माय लाईफच्या पुस्तкаतून स्पष्टपणे दिसून येते.

अडवाणीजी नेहमीच सिंधी संस्कृतीशी जोडलेले राहile. त्यांच्या या निधेचा एक दाखला म्हणजे लेहजबद्दल सिंधू दर्शन पूजेला लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, मी स्वतः अडवाणीजी आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत एका पूजेला उपस्थित होतो. कमला अडवाणीजींचा उल्लेख केल्याशिवाय अडवाणींजींच्या या उल्लेखनीय प्रवासाची कोणतीही माहिती अपूर्ण राहील. त्यांच्या संपूर्ण सार्वजनिक जीवनात त्या अडवाणींजींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि त्यांच्या ऊर्जेचा सतत स्रोत राहिल्या. कराचीमध्ये लहानचे मोठे झालेले अडवाणींजी यांनी त्यांच्या आयुष्याला कोणते बलून मिळेल याच्या कधी विचारही केला नसेल. भारतात पुरस्काराने सम्मानित करण्यात आले, अडवाणीजी १०० व्या वर्षांत पदार्पण करत असताना, त्यांना उत्तम आरोग्य लाभावे आणि त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहावे, अशी मी प्रार्थना करतो.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : ​२३ कोटींच्या सुरक्षा कवचात चरसचा सुळसुळाट; नाशिकरोड...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik कारागृहांची (Jail) सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम आणि आधुनिक करण्यासाठी शासन स्तरावर कोट्यवधी रुपयांचा निधी पाण्यासारखा वाहिला जात आहे. गृह विभागाकडून...