Wednesday, October 16, 2024
Homeब्रेकिंग न्यूजPolitical Special : मविआतील इच्छुकांना जागावाटपाची प्रतीक्षा

Political Special : मविआतील इच्छुकांना जागावाटपाची प्रतीक्षा

नाशिकमधील चारही जागांवर सर्वच पक्षांची दावेदारी

नाशिक | निशिकांत पाटील | Nashik

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा (Maharashtra Assembly Elections) बिगुल वाजला असून निवडणूक आयोगाने आचारसंहिताही जारी केली आहे. मात्र महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) अद्यापपर्यंत जागावाटप झाले नसल्याने नाशिक शहरातील (Nashik City) ४ जागांबाबत कोणती जागा कोणत्या पक्षाला सुटेल हे अद्याप सांगणे कठीण असले तरी महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीने मतदार संघावर दावेदारी सांगत आहेत. शिवसेना व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता सहा पक्षांमध्ये लढत होणार आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Mahayuti Press Conference : महायुतीचे ‘रिपोर्ट कार्ड’ प्रकाशित; कुठे केली गुंतवणूक, कोणती कामे केली?

सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक पश्चिममधून जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर व नाशिक मध्यमधून (Nashik Central) वसंत गिते या दोघा उमेदवारांची नावे घोषित केले आहेत. तर नाशिक पूर्व व देवळाली मतदारसंघात अद्याप उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या उमेदवारीसाठी काही दिवसांपूर्वीच इच्छुकांच्या मुलाखती (Interview) झाल्या असल्याने प्रत्येक उमेदवाराने आपण निवडून कशाप्रकारे निवडून येऊ त्याची गणिते प्रमुखांसमोर मांडली आहेत. यंदाची विधानसभा निवडणूक ही महाविकास आघाडीसाठी अस्तित्वाची लढाई असल्याने वरिष्ठ पातळीवर मोठ्या प्रमाणावर मोर्चेबांधणी सुरु असली तरी स्थानिक स्तरावर उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज पदाधिकाऱ्यांना पक्षात टिकवून ठेवण्यासाठी व पक्षाने दिलेला उमेदवार आणण्यासाठी रणनीती आखण्याची गरज आहे.

हे देखील वाचा : Mahayuti Press Conference : “… तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार”; महायुतीच्या नेत्यांचा विरोधकांवर हल्लाबोल

दरम्यान, नाशिक पश्चिम मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar) पक्षात वरिष्ठ नेते नाना महाले व माजी आमदार नितीन भोसले हे दोघेच इच्छुक आहेत. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असल्याने येथील जागा नेमकी कोणत्या पक्षाला सुटेल याबाबत सर्वांमध्ये उत्सुकता लागून आहे. असे असले तरी वरिष्ठ पातळीवर या मतदारसंघाची जागा आपल्या पक्षाला सुटावी व जिंकून येण्यासाठी आखलेली रणनीती पक्ष प्रमुखांना सांगण्यात कोण यशस्वी ठरेल? याकडे मतदारांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या