Sunday, September 29, 2024
HomeराजकीयPolitical Special : महायुतीकडून जातीय समीकरण राखण्याचा प्रयत्न

Political Special : महायुतीकडून जातीय समीकरण राखण्याचा प्रयत्न

नाशिक | Nashik

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) महाराष्ट्रात (Maharashtra) भारतीय जनता पक्षासह महायुतीला (Mahayuti) मोठा धक्का बसला. ४५ प्लसचा नारा देण्यात आला होता, मात्र प्रत्यक्षात तसे न होता महाविकास आघाडीने बाजी मारल्याने त्यावेळेस तिकीटवाटप करताना जातीय समतोल राखण्यात कुठेतरी कमी पडल्याची चर्चा झाली होती. म्हणून आता विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून कोणत्याही प्रकारे धोका पत्करायचा नसून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचाच भाग काल नाशिकमध्ये (Nashik) पाहायला मिळाला.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik : क्रांतीसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या शिल्पाचे लोकार्पण

नाशिकमध्ये शनिवारी (दि. २८) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्यासह सुमारे अर्धा डझन मंत्री, मान्यवर यांनी विकासकामांचे उद्घाटन केले. हे करताना त्यांनी विशेष करून जातीय समतोल राखण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. त्यामुळे आगामी निवडणुकीत याचा किती फायदा होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मध्य नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांच्या विशेष प्रयत्नातून नाशिक येथे मराठा समाजातील ५०० विद्यार्थी व ५०० विद्यार्थिनींसाठी बांधण्यात येणाऱ्या दहा मजली वसतिगृहाचे बांधकाम छत्रपती शाहू महाराज मानव संशोधन व विकास संस्था (सारथी) संस्थेमार्फत केले जाणार आहे.

हे देखील वाचा : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? निवडणूक आयुक्त राजीव कुमारांनी स्पष्टच सांगितलं

तसेच धनगर समाजातील (Dhangar Community) १०० विद्यार्थ्यांसाठी व १०० विद्यार्थिनींसाठी वसतिगृहाचे बांधकाम देखील केले जाणार आहे. या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी मराठा व धनगर समाजाला खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आला तर मुंबईनाका येथे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून सावित्रीबाई फुले चौकात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्यदिव्य स्मारक उभारण्यात आले आहे. यामुळे ओबीसींसह विशेषकरून माळी समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या