Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजPolitical Special : पवारांच्या हस्ते दिल्लीत शिंदेंचा सत्कार; आरोप-प्रत्यारोपांमुळे महाविकास आघाडीचे भवितव्य...

Political Special : पवारांच्या हस्ते दिल्लीत शिंदेंचा सत्कार; आरोप-प्रत्यारोपांमुळे महाविकास आघाडीचे भवितव्य धोक्यात

नाशिक | फारुक पठाण | Nashik

हल्ली राजकारणात (Political) कधी क्राय होईल याचा नेम नाही. त्यातच राज्यात्तील राजकीय वातावरण दिवसेंदिवस रंगतदार होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) थेट मनसेना प्रमुख राज ठाकरेंच्या घरी गेल्याने चर्चाना उधाण आले होते. तर आता दिल्लीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पुरस्कार प्रदान केल्याने राज्यात एकप्रकारे राजकीय भूकंप झाल्याचे दिसत आहे. या घटनेचे पडसाद काही दिवसांमध्ये दिसून बेतीलच, मात्र महाविकास आघाडीवर त्याचा काय परिणाम होतो हे पाहणेदेखील महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

खा. पवारांच्या हस्ते दिल्लीत उपमु‌ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे यांच्या नावाने राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सत्कार झाला. त्यावरून महाराष्ट्रातील राजकारण (Maharashtra Politics) राजकीय तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी आज सकाळीच खा. शरद पवारांवर जोरदार टीकास सोडले तर त्याचे उत्तर शिवसेना शिदे गटानेही देत राऊतांवर हल्लाबोल केला.

एकनाथ शिंदे यांचा सत्कार होणे ही आनंदाची गोष्ट असून उद्या संजय राऊत आशा भोसलेंना देखील देशद्रोही ठरवणार का? असा सवाल शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री संजय शिरसाट (Minister Sanjay Shirsat) यांनी केला. शिरसाट यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि एकनाथ शिंदे यांच्यावरून संजय राऊतांबर टीका केली. त्याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाष्य केले. महाराष्ट्रातील माणसाचा सत्कार होतोय ही अभिमानाची बाब आहे. संजय राऊत हे शकुनी आहेत. महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) असेल किंवा आम्ही फुटण्यास संजय राऊतच कारणीभूत असल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केला.

निवडणुकांच्या तोंडावर घडामोडी

आगामी काळात राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी गल्लीपासून दिल्लीपर्यंत होताना दिसत आहेत. नाशिकमधीलच अनेक माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे तर आगामी काळात आणखी काही लोक जाणार आहेत. येत्या शुक्रवारी (दि.१४) उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळीदेखील मोठ्या प्रमाणात इतर पक्षांचे नेते सेनेत प्रवेश घेणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन घेतलेली भेट व शरद पवार व एकनाथ शिंदे यांच्यात होणारी जवळीक महाविकास आघाडीसह म हायुतीलादेखील डोकेदुखी वरणारी ठरू शकते, अशी देखील चर्चा रंगत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...