Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रवादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या IAS अधिकारी पूजा खेडकर पहिल्यांदाच आल्या कॅमेऱ्यासमोर; म्हणाल्या, "मी...

वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या IAS अधिकारी पूजा खेडकर पहिल्यांदाच आल्या कॅमेऱ्यासमोर; म्हणाल्या, “मी काम…”

मुंबई | Mumbai

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तुवणूक आणि अवाजवी मागण्यांमुळे चर्चेत असलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांची वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या विविध सुरस कथा सातत्याने समोर येत आहेत.त्यानंतर आता खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. तसेच बदली झालेल्या ठिकाणी रुजू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Accident News : उभ्या असलेल्या कंटेनरवर कार जाऊन धडकल्याने भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, ” मी वाशिम जिल्ह्यात रुजू होत आहे त्याचा मला खूप आनंद आहे. मला त्याबाबत काहीही अधिकृतरित्या बोलता येणार नाही. सरकारी नियमानुसार मला त्या विषयावर बोलण्याची मुभा नाही.कृपया माल माफ करा. मला आता या विषयावर काहीही बोलता येणार नाही. आज मी अधिकृतरित्या वाशिम जिल्ह्यात रुजू झाली आहे. इकडे काम करण्यासाठी मी उत्सुक आहे, असे पुजा खेडकर यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा : BLOG : वाढत्या लोकसंख्येचे आव्हान

नेमकं प्रकरण काय?

व्हीआयपी नंबर प्लेट असलेल्या ऑडी कारवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन असे लिहिल्यामुळे पूजा खेडकर या प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. नंतर असा दावा करण्यात आला की, पूजा यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबरवरही कब्जा केला होता.तिथे त्यांनी स्वत:च्या नावाचा बोर्डही लावला होता. पूजा यांच्या या वागणुकीबाबत अखेर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्याचे मुख्य अप्पर सचिवांकडे (सेवा) यांना पत्र लिहित आयएएस पूजा खेडकरांची तक्रार केली होती. यानंतर पूजा खेडकर यांची पुण्याहून वाशिम येथे बदली करण्यात आली.प्रशिक्षणार्थी अधिकारी असताना एखाद्या व्यक्तीची बदली होण्याची ही एक दुर्मिळ घटना मानली जात आहे. मात्र, आता फक्त बदलीवर भागणार नसून त्यांच्या नोकरीवरच गदा येण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान कार्यालयाने मागितला अहवाल

पूजा खेडकर यांच्यसंदर्भात समोर आलेल्या गोष्टी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांचे गैरवर्तन या पार्श्वभूमीवर त्यांची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. हे प्रकरण दिल्लीपर्यंत पोहोचले असून बुधवारी थेट पंतप्रधान कार्यालयाने पूजा खेडकर यांच्यासंदर्भातील अहवाल पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितला आहे. एका वृत्तपत्राने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. त्यामुळे केंद्रीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असणाऱ्या पूजा खेडकर यांच्यावर दिल्लीतूनही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या