Thursday, May 2, 2024
HomeनाशिकPhotoGallery : आडगावात सार्वजनिक शौचालयाचे तीन-तेरा

PhotoGallery : आडगावात सार्वजनिक शौचालयाचे तीन-तेरा

नाशिक । Nashik

नाशिक शहराचा देशातील दहा स्वच्छ शहरात समावेश व्हावा म्हणुन महापालिका प्रशासनांकडुन उपाय योजना करतांनाच व स्वच्छता मोहीम राबविली जात आहे.

- Advertisement -

विशेषत: शहरातील स्वच्छता गृहाची स्वच्छता व दुरुस्तीची कामे केली जात असतांनाच स्वच्छता अभियान 2021 मधुन पंचवटीतील आडगांव या उपनगराला वगळले कि काय ? असा प्रश्न आडगांवकरांना पडला असल्याचा आरोप शिवसेनेकडुन करण्यात आला आहे.

अनेक वर्षापासुन आडगांवची स्वच्छतागृहाची दुरावस्था झालेली असतांना नगरसेवक व आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले जात असल्याने आता आयुक्तांनीच याठिकाणी पाहणी करावी अशी मागणी पुढे आली आहे.

महापालिकेच्या पंचवटी विभागातील प्रभाग 2 हा भाग सर्वाधिक क्षेत्रफळाचा असतांना या प्रमाणात गावठाण व शिवारातील उपनगरांना अद्यापही आरोग्यसेवा पुरवविण्यात महापालिका प्रशासन असमर्थ ठरल्याचा आरोप शिवसेना पंचवटी विभाग संघटक पोपट शिंदे यांनी केला आहे.

नाशिक शहराचा देशातील दहा स्वच्छ शहरात समावेश व्हावा म्हणुन मनपाकडुन स्वच्छ सर्व्हेक्षणांतर्गत विविध कामे, सार्वजनिक स्वच्छतागृहाची दुरुस्ती – स्वच्छता अशी कामे व इतर उपाय योजना केल्या जात आहे. यासंपुर्ण कामांतून आडगांव हा गावठाणचा परिसर वगळण्यात आला असल्याचा आरोप सेना संघटक शिंदे यांनी केला आहे.

आडगांव गावठाणाची लोकसंख्या 25 – 30 हजाराच्यावर असतांना या प्रमाणात स्वच्छतागृह व आरोग्य सेवेची सु विधा करण्यात आलेली नाही. याठिकाणी बस स्थानक परिसर परिसरात नागरिकांसाठी असलेल्या स्वच्छता गृहाची अवस्था प्रशासनला लाजविणारी असुन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारी आहे.

स्वच्छ सर्व्हेक्षणाची शहरात कामे सुरु असतांना याठिकाणी मात्र स्वच्छतागृहात आत जाणे अवघड झाले असुन सर्वत्र दुर्गंधीने आरोग्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे नगरसेवकांचे दुर्लक्ष असुन अधिकारी याभागात फिरकत नाही. अशाप्रकारे केविलवाणी अवस्था गेल्या अनेक वर्षापासुन असुन स्वच्छ सर्व्हेक्षणात या स्वच्छतागृहाची स्वच्छता व दुरुस्ती होईल अशी अपेक्षा आहे. हे वास्तव पाहण्यासाठी आयुक्तांनीच याभागाला भेट द्यावीत अशी मागणी नागरिक करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या