Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्यातुटलेल्या साहित्यांंमुळे अपघाताची शक्यता

तुटलेल्या साहित्यांंमुळे अपघाताची शक्यता

नवीन नाशिक । निशिकांत पाटील New Nashik

कामगार वसाहत म्हणून ओळख असलेल्या नवीन नाशिक परिसरात कामगार वर्गाची प्रकृती सुदृढ रहावी तसेच या मेहनतीवर्गाला व्यायामाद्वारे शरीरयष्टी चांगली मिळावी याकरिता विदेशाच्या धर्तीवर आमदार, खासदार व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या निधीतून विविध ठिकाणी सुमारे 120 ग्रीन जिम बसविण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

त्यापैकी सुमारे 20 ते 25 ग्रीन जिम ह्या नाशिक पश्चिमच्या आमदार सिमा हिरे यांच्या निधीतून बसविण्यात आल्या आहेत.जसजसे या ग्रीन जिमचा वापर वाढू लागला तसतसे त्याच्या देखभालीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने तसेच काही नागरिकांच्या चुकीच्या वापरामुळे ग्रीन जिमची दुरवस्था झाली आहे.या तुटलेल्या साहित्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

नाशिक महानगरपालिकेतर्फे शहरातील सहाही विभागामध्ये या ग्रीन जिमच्या दुरुस्तीकरिता ठेकेदाराची निवड करण्यात येणार होती. मात्र ग्रीन जिमची दुरवस्था बघता अद्यापही ही निवड झाली नसल्याचे समजते.यामुळे व्यायामप्रेमींमध्ये कमालीची नाराजी बघायला मिळते.सध्या हिवाळा असल्याने नवीन नाशिक मधील क्रीडांगणांवर तसेच जॉगिंग ट्रॅकवर पहाटेपासूनच व्यायामप्रेमींची गर्दी होते मात्र ग्रिन जिमच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये कमालीची नाराजी बघायला मिळत आहे.

ग्रीन जिम हि लोकांना त्यांची प्रकृती सुदृढ राहण्याच्या उद्देशाने उभारण्यात आली. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे व दुर्लक्षामुळे नवीन नाशकातील बर्‍याच ठिकाणी असलेल्या ग्रिन जिमचे साहित्य तुटलेल्या अवस्थेत आहे. सध्या मनपावर प्रशासकीय राजवट असल्याने अधिकारी वर्गाने या प्रश्नाकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. प्रशासकीय अधिकार्‍यांनी निदान ग्रिन जिमच्या डागडुजीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

– कृष्णा काळे, महाकाली चौक, नवीन नाशिक

ग्रीन जिम चा लोकार्पण सोहळा होत असतांना मोठ्याप्रमाणावर फोटो सेशन केले जाते मात्र त्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केले जाते. प्रशासकीय अधिकार्‍यांनी एक टिम नेमून प्रत्येक विभागांतील ग्रिन जिमच्या साहित्याची पाहणी केली पाहिजे व नादुरुस्त सामान दुरुस्त करून लोकांच्या वापरासाठी खुले करून दिले पाहिजे.

अमोल नाईक, नाईक मळा, नवीन नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या