Sunday, May 19, 2024
Homeनाशिकबार्‍हे परिसरातील वीजपुरवठा होणार सुरळीत

बार्‍हे परिसरातील वीजपुरवठा होणार सुरळीत

कळवण । प्रतिनिधी

विधानसभेच्या निवडणुकीत आमदार नितीन पवार यांनी बार्‍हे येथील 33/11 केव्ही उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लावून बार्‍हे परिसरातील 40 गावांचा वीज प्रश्न सोडवून परिसरात सुरळीत विज उपलब्ध करुन देऊ असे वचन दिले होते. आमदार नितीन पवारांकडून वचननाम्याची वचनपूर्ती होऊन बार्‍हे येथील 33/11 केव्ही विज उपकेंद्राला शासनाने 6 कोटी 5 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे बार्‍हे परिसरातील विजेचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

- Advertisement -

बार्‍हे येथील 33/11 केव्ही विद्युत उपकेंद्राला पहिल्या टप्यात 4 कोटी रुपये निधीस जिल्हा वार्षिक योजनेतून आदिवासी उपाययोजना अंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच काम सुरू होणार असल्यामुळे बार्‍हे परिसरातील, गावातील व खेड्यांना सुरळीत वीज मिळणार आहे.

या उपकेंद्रांमुळे बार्‍हे, गडगा, पोपाळपूर, आळीवदांड, शेंदरपाडा, गुरटेंबी, हट्टीपाडा, वाघनखी, म्हैसमाळ, ठाणगांव, बेडसे, कोटंबी, जांभुळपाडा, गहाले, खडकमाळ, देवळा, मेरदांड, पळसेत, कोटंबी, मनखेड, भाटविहिर, हेबांडपाडा, नडगदरी, सादुडणे, मुरुमदरी, वडपाडा, शेंगाणे, मोधळपाडा, विजुरपाडा, सांबरखल, ओरंभे, मास्तेमाणी, मांगदे, आंबेपाडा, हस्ते, हापूपाडा, सुकतळे, जाहुले, सायळपाडा, जांभुळपाडा (दा.), कळमणे, खिरमानी, आंबोडे, सरमाळ, आंबुपाडा (बे.), झगडपाडा, केळावण, खोकरविहिर, खडकी, खिर्डी, खोबळ, कहांडोळपाडा, भेनशेत, उंडसोहळ भाटी, पिंपळचोंड, करंजुल (पे), राक्षसभुवन, आमदा, मांडवा हि गावे असुन चिंचदा, बोरपाडा, सर्कलपाडा, बांजूळपाडा, जायविहिर, रानपाडा, आंब्याचापाडा, कवेली, बर्डा, कचूरपाडा, सागपाडा, डंबुरणे, कोडीपाडा या परिसरातील वीजेच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचे नियोजन आहे.

बार्‍हे व आजुबाजूच्या खेड्यांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळत नसल्याने या परिसरातील नागरिकांना आमदार नितीन पवार यांनी वीज पुरवठा सुरळीत करुन देण्याचा शब्द दिला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या