Wednesday, November 6, 2024
Homeनगरराहुरीत घरकुल योजनेच्या निधीचे लाभार्थ्यांना लवकरच वितरण

राहुरीत घरकुल योजनेच्या निधीचे लाभार्थ्यांना लवकरच वितरण

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा (Pradhan Mantri Awas Gharkul Yojana) रखडलेला निधी अखेर पालिकेस (Municipalities) प्राप्त झाला असून लवकरच निधी लाभार्थ्यांना वितरित केला जाणार असल्याची माहिती नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Minister of State for Urban Development Prajakt Tanpure) यांनी दिली.

- Advertisement -

ना. तनपुरे (Minister of State for Urban Development Prajakt Tanpure) म्हणाले, प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेसाठी (Pradhan Mantri Awas Gharkul Yojana) केंद्र व राज्य शासनाचा निधी (Central and state government funds) असतो. राज्य शासनाने त्यांच्या वाट्याचा निधी यापूर्वीच पालिकेला अदा केलेला आहे. मात्र, केंद्र सरकारचा निधी प्राप्त होत नव्हता. त्यासाठी नगरविकास व गृहनिर्माण या खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांची मुंबई येथे बैठक घेऊन समस्यांचे निराकरण करण्यात आले होते. तसेच केंद्राकडून रखडलेला निधी कसा मिळविता येईल व कोणत्या उपाययोजना करता येतील? याविषयी माहिती घेण्यात आली. संबंधित विभागाशी पाठपुरावा करून निधी मिळविण्यास यश आले. केंद्र सरकारकडील सुमारे दोन कोटी 62 लाख 80 हजार रुपयाचा घरकुल योजनेचा निधी रखडलेला होता. अनेक लाभार्थ्यांनी घरकुलाचे कामकाज सुरू केले होते. काही लाभार्थ्यांना पैसे नसल्यामुळे पुढील बांधकाम करता येत नव्हते. त्यामुळे योजनेतील लाभार्थी आर्थिक पेचप्रसंगात अडकलेले होते.

राहुरी पालिकेत (Rahuri Municipality) अनेक लाभार्थ्यांनी निधी मिळण्यासाठी हेलपाटे मारलेले होते. राहुरी नगरपालिका(Rahuri Municipality) हद्दीत 460 लाभार्थी निधीवाचून वंचित होते. राज्य शासनाची प्रति लाभार्थी दीड लाख रुपये रक्कम यापूर्वीच वितरित केली आहे. आता केंद्राचाही निधी उपलब्ध झाल्याने वंचित असलेल्या लाभार्थ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. प्रधानमंत्री घरकुल आवास योजना ( Pradhan Mantri Gharkul Awas Yojana) अधिक यशस्वी करण्यासाठी राहुरी नगरपालिकेचे प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. रखडलेला निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने अनेक लाभार्थ्यांनी मंत्री तनपुरे (Minister of State for Urban Development Prajakt Tanpure) यांचे आभार व्यक्त केले. याप्रश्नी विद्यमान नगराध्यक्ष अनिल कासार, उपाध्यक्षा नंदाताई उंडे व नगरसेवकांनी अधिक परिश्रम घेतले होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या