Sunday, October 6, 2024
Homeराजकीयराष्ट्रवादी विधानसभेच्या किती जागा लढवणार? प्रफुल्ल पटेलांनी थेट आकडाच सांगितला

राष्ट्रवादी विधानसभेच्या किती जागा लढवणार? प्रफुल्ल पटेलांनी थेट आकडाच सांगितला

मुंबई | Mumbai

नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका (Loksabha Election) पार पडल्या आहेत. या निवडणुकांत राज्यातील महायुतीला अवघ्या १७ जागा तर महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्या आहेत. मात्र, महायुतीच्या (Mahayuti) राज्यात जागा जरी कमी आल्या असल्या तरी केंद्रात एनडीएचे (NDA) सरकार स्थापन झाले आहे. महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लोकसभेच्या केवळ चार जागा निवडणूक लढविण्यासाठी मिळाल्या होत्या. यातील एका जागेवर त्यांचा उमेदवार विजयी झाला असून इतर जागांवर पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने (Ajit Pawar NCP) विधानसभेला सावध पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : म्हसरूळला रिक्षाचालकाची हत्या

काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी महायुतीमधून (Mahayuti)आमच्या पक्षाला विधानसभेला ८५ ते ९० जागा मिळाव्यात असे म्हटले होते. त्यामुळे विधानसभेला राष्ट्रवादी नेमकी किती जागा लढणार? याबाबत चर्चा सुरू होत्या. त्यानंतर आता अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही या संख्येला दुजोरा देत राष्ट्रवादी विधानसभेच्या नेमक्या किती जागा लढणार? याचा थेट आकडाच सांगितला आहे. ते गोंदिया येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना बोलत होते.

हे देखील वाचा : सरसंघचालक भागवत आणि योगी यांच्यात ३० मिनीटं बंद दाराआड चर्चा?

यावेळी प्रफुल्ल पटेल (Praful Patel) म्हणाले की, “आमचे तीन पक्षाचे सरकार आहे. त्यामध्ये आम्ही सर्व जागा तर मागू शकत नाही. परंतु आमचे संयुक्त राष्ट्रवादीचे आणि सहयोगी मिळून ५७ आमदार होते. त्या अनुषंगाने छगन भुजबळ यांनी ८५ ते ९० जागांची मागणी पुढे केली. आम्हालाही ही संख्या योग्य वाटते. तसेच कोणताही राजकीय पक्ष असो त्यांना युती होण्यापूर्वी २८८ जागांवर निवडणूक लढण्याची तयारी ठेवावी लागते. आम्ही सुद्धा २८८ जांगावर निवडणूक लढण्याची तयारी ठेवली आहे. जेव्हा आपण युती करण्याचा निर्णय घेतो, तेव्हा वाटाघाटी करून जागा लढवाव्या लागतात. राज्यातील प्रत्येक पक्षांचे असे धोरण असते, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन; काँग्रेस, ठाकरे गटाचा आरोप, गुन्हा दाखल

पुढे ते म्हणाले की, ‘लवकरच महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होणार असून जी पदे खाली आहेत त्या ठिकाणी विस्तार करून ती भरली जाणार आहेत. तसेच मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास वाचलेल्या महिन्यात चांगल्या जोमाने काम करता येईल. असेही पटेल यांनी म्हटले. त्यासोबतच केंद्रामध्ये राष्ट्रवादीच्या कोट्यात जर कॅबिनेट मंत्रीपद आले तर ते मलाच मिळणार असून योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय होईल असा दावाही यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी केला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या