Tuesday, September 17, 2024
Homeब्रेकिंग न्यूजविधानसभेसाठी अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वेक्षण करणार

विधानसभेसाठी अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वेक्षण करणार

प्रफुल्ल पटेलांची माहिती  

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election) अपयश लक्षात घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांचा सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी सोमवारी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना पक्षाच्या निर्णयाची माहिती दिली. तसेच आगामी विधानसभा निवडणूक ही महायुती म्हणूनच लढविणार असल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले.

हे देखील वाचा : छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर; कारण अद्याप गुलदस्त्यात

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) आमच्या पक्षाचे ५४ आमदार (MLA) निवडून आले होते. त्यातील पंढरपूरची जागा आम्ही पोटनिवडणुकीत गमावली. आता पक्ष म्हणून आमचे ५३ आमदार आहेत. त्याव्यतिरिक्त पाठिंबा दिलेल्या आमदारांची संख्या लक्षात आम्हाला विधानसभेला ६० पेक्षा जास्त जागा मिळायला हव्यात, अशी भूमिकाही पटेल यांनी स्पष्ट केली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी आज पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी सर्वेक्षण करणार असल्याचे सांगितले.

हे देखील वाचा : शरद पवारांसोबत भेटीत काय चर्चा झाली? भुजबळांनी पत्रकार परिषदेत सगळचं सांगितलं

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सर्वेक्षणानुसार महायुतीचे जागावाटप झाले होते. आता विधानसभेचे जागावाटपही सर्वेक्षणाच्या आधारावर होणार का? या प्रश्नावर, आम्ही विधानसभेसाठी सर्वेक्षण करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. परंतु, आम्ही केवळ आमच्याकडील मतदारसंघांचे सर्वेक्षण करणार नसून सर्व २८८ जागांचे सर्वेक्षण करणार आहोत. इतर मतदारसंघात आमच्याकडे एखादा सक्षम उमेदवार असेल तर त्याच्यावर अन्याय नको म्हणून सर्वेक्षण करणार असल्याचे पटेल यांनी सांगितले. या सर्वेक्षणानुसार  जागावाटप करणार का? या प्रश्नावर, यावेळी महायुतीतील तीनही पक्ष आपापले सर्वेक्षण करतील. प्रत्येकाच्या सर्वेक्षण अहवालाच्या आधारे आम्ही जागा वाटपाच्या चर्चेला बसू, असे अजित पवारांनी सांगितले.

हे देखील वाचा : सिल्व्हर ओकवर पवारांच्या भेटीला जाण्याआधी भुजबळांनी पक्षातील ‘या’ नेत्याला सांगितलं होतं

सध्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आहेत. त्यामुळे सध्या त्यांचीच गॅरंटी चालेल. आगामी विधानसभा निवडणूक कोणाच्या नेतृत्वाखाली लढवायची याचा निर्णय महायुतीत मोठा पक्ष असलेला भाजप घेईल, असे अजित पवारांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपची मते अजित पवार गटाला मिळाली नसल्याची चर्चा आहे. मात्र ही चर्चा अजित पवारांनी फेटाळून लावली. रायगडसह इतर मतदारसंघातही आम्हाला भाजपची मते मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर माढा आणि अहमदनगर लोकसभेची जागा आम्हाला मिळाली असती तर आज तिथे महायुतीचे खासदार असते, असेही ते म्हणाले.

हे देखील वाचा : Nashik News : पावसात फिरायला गेले आणि अडकले; अंजनेरी गडावरचा रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक Video आला समोर

तसेच सातारा लोकसभा मतदारसंघाच्या जागेच्या बदल्यात अजित पवार गटाला मिळणाऱ्या राज्यसभेच्या जागी सातारचाच उमेदवार देणार का? याबाबत विचारले असता, त्यासंदर्भात पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितले. सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याबाबतचा निर्णय पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता, याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले. नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत आम्ही कोणालाही प्रलोभन दाखवले नाही. फक्त नमस्कार केला आणि मत मागितले, असेही अजित पवार म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या