नाशिक | प्रतिनिधी Nashik
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या उपस्थितीत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिकमधील निवासस्थानासमोर मशाल पेटवून आंदोलन सुरु आहे.
- Advertisement -
विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी या विषयाचा उल्लेख होता. तसेच महायुतीच्या नेत्यांनी देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी करु असे आश्वासनं दिले होते. मात्र, अद्यापही कर्जमाफीबाबतचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह प्रहार संघटना देखील आक्रमक झाली आहे.