मुंबई | Mumbai
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते प्रकाश राज हे सतत त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. ते सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे त्यांचे मत मांडताना दिसतात. प्रकाश राज हे बराच वेळा भाजपवर निशाणा साधताना दिसतात. नुकताच त्यांनी केलेल्या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
प्रकाश राज यांनी हिटलर आणि नरेंद्र मोदी यांचा लोकांसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, ‘इतिहासाची पुनरावृत्ती.. काटेरी तारांमागे भविष्य आहे.. सावधान..’ प्रकाश राज यांच्या या ट्वीटची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. प्रकाश राज यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन नरेंद्र मोदी यांची तुलना हिटलरसोबत केली का? असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे.
Char Dham Yatra : केदारनाथ, बद्रीनाथ मार्गांवर पुन्हा निसर्ग कोपला… थरकाप उडवण्याऱ्या घटनेचा VIDEO व्हायरल
प्रकाश राज यांच्या ट्विटनंतर अनेक जण त्यांच्यावर टीका करत आहे. देशाच्या पंतप्रधानांची तुलना हिटलरशी केल्याने युजर्स चांगलेच संतापले आहेत. तर काही जण मात्र त्यांचं समर्थन करतानाही दिसत आहेत. दरम्यान, प्रकाश राज यांनी पंतप्रधान मोदींची हिटलरशी तुलना करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही प्रकाश राज यांनी त्यांची तुलना हिटलरशी केली आहे. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिटलरचा वृत्तपत्र वाचतानाचा फोटो शेअर केला होता. त्यावेळी त्यांनी मोदींना हिटलरचा पुनर्रअवतार म्हटलं होतं.
Samruddhi Mahamarg : शेतकऱ्याने ट्रॅक्टर आडवे करून रोखला ‘समृद्धी महामार्ग’… कारण काय?
तसेच काही दिवसांपूर्वी प्रकाश राज यांनी द कश्मीर फाईल्स या चित्रपटावर देखील टीका केली. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ते म्हणाले, ‘द कश्मीर फाइल्स हा एक नॉनसेन्स चित्रपट आहे, पण त्याची निर्मिती कोणी केली हे आपल्याला माहीत आहे. आंतरराष्ट्रीय ज्युरी त्याच्यावर थुंकतात. ते अजूनही निर्लज्ज आहेत. दिग्दर्शक अजूनही सांगत आहे, ‘मला ऑस्कर का मिळत नाही?’ त्याला भास्कर पुरस्कारही मिळणार नाही.’
….अन् राज ठाकरेंनी रेखाटलं अजितदादांचं व्यंगचित्र; म्हणाले, “झालं ते गोड माना…”
प्रकाश राज यांनी हिंदी आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे.त्यांनी सिंघम या चित्रपटात साकरलेल्या जयकांत शिक्रे या भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. तसेच त्यांनी वारिसू, केजीएफ, वॉन्टेड या चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. नेटफ्लिक्सवरील ‘नवरस’ या चित्रपटात देखील त्यांनी काम केलं.