Thursday, March 27, 2025
Homeमनोरंजनअखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले

मुंबई | Mumbai

अखिल भारतीय मराठी नाट्य महामंडळाच्या Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) वतीने पार पडलेल्या मराठी नाट्यपरिषदेच्या निवडणूकीचा निकाल जाहीर झाला आहे.

- Advertisement -

यामध्ये रंगकर्मी पॅनलचा विजय झाला आहे. त्यामध्ये प्रसिद्ध नाटयकर्मी, कलावंत प्रशांत दामले (Prashant Damle) यांची निवड झाली आहे. अशी माहिती नाट्यपरिषदेच्या वतीनं देण्यात आली आहे.

प्रसाद कांबळी (Prasad Kambli) यांचे ‘आपलं पॅनल’ आणि प्रशांत दामले (Prashant Damle) यांचं ‘रंगकर्मी समूह’ या दोन गटांमध्ये चांगलीच चुरस रंगली. प्रसाद कांबळी आणि प्रशांत दामले या दोघांमध्ये कोण लढत जिंकणार याची उत्सुकता ताणली गेली होती.

अखेर निकाल हाती आला आहे. सगळ्यांचं लक्ष लागलेलं असलेली जागा म्हणजे नाट्यपरिषदेचं अध्यक्षपद प्रशांत दामले यांनी जिंकलेलं आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 11 जणांची कार्यकारिणीवर निवड करण्यात आली आहे. यात सुशांत शेलार, गिरीश महाजन, विजय चौगुले, संदीप तेंडुलकर, दीपा क्षीरसागर, सविता मालपेकर, संदीप पाटील, विशाल शिंगाडे, विजयकुमार साळुंखे, संजय रहाटे, दीपक रेगेंचा कार्यकारिणीत समावेश आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आर्मीची संधी हुकली… तरुणाने संपविले जीवन

0
धुळे । प्रतिनिधी- आर्मीत भरतीसाठी प्रयत्नशील असलेल्या तालुक्यातील रामी येथील तरुणाने अवघ्या दोन गुणांनी संधी हुकल्याने नैराश्यातून गळफास लावून आत्महत्या केली. अक्षय यशवंत माळी...